वडवली येथे दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्र चिकित्सा उपक्रम संपन्न ...

वडवली ग्रामस्थांच्या सहकार्याने  आणि श्री.संदीप लक्ष्मण बिराडी, श्री.सुरेश गोविंद नाक्ती, श्री.महेश लक्ष्मण नाक्ती आणि श्री.संतोष रामा नाक्ती यांच्या संकल्पनेतून  दिनांक 18/11/2017 रोजी रा.जि.प.मराठी शाळा वडवली येथे दिव्यांग (अपंग) व्यक्तींचे प्रमानपत्रासाठी चिकित्सा करण्यात आली. तरी सदर उपक्रम हा संपूर्ण रायगड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) मा.डॉ.श्री.अजित गवळी सर  आणि
 मानसोपचारतज्ञ - डॉ.अर्चना सिंग,
अस्थिरोगतज्ञ - डॉ.मृणालिनी कदम 
नेत्रशल्यचिकित्सक - डॉ.विजयकुमार जाधव, नेत्रचिकित्सा अधिकारी- डॉ.एस.एम. ढलाईत, श्री.रूपेश म्हात्रे,
भौतिकोपचारतज्ञ - डॉ.रविराज चौहान 
कान,नाक,घसातज्ञ - डॉ अंकुश शिंदे, 
व्यवसोपचारतज्ञ - हिमांगिनी देशपांडे ,
तांत्रिक मानसिक- श्रीम.प्रफुल्ला कांबळे, 
अधिपरिचारिका मानसिक -  श्रीम. भाग्यश्री खोत,श्रीम.तेजश्री पाटील, ऑडियोलॉजिस्ट -श्री.समाधान चौधरी,
श्री.कैलाश सूर्यवंशी,
सहा.अधिक्षक - श्री.सिध्दार्थ चौरे 
आदि. स्टाप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर उपक्रमात एकूण 52 दिव्यांग्याचे (अपंगांची) चिकित्सा करण्यात आली. त्यामधील 13 व्यक्ती अपात्र ठरले आणि 39 व्यक्ती पात्र ठरले. त्यामध्ये अस्थिव्यंग - 13, नेत्र - 9, कर्णबधिर - 2, मनोरुग्न - 15 असे एकूण 39 दिव्यांग पात्र ठरले. तसेच 
21 दिव्यांगाचे जुने प्रमाणपत्र नुतनिकरण करण्याकरिता सादर करण्यात आले.
सदर उपक्रमाला ग्रुप ग्राम पंचायत वडवलीच्या विद्यमान सरपंच  सौ.जयश्री महेश कांबळे मॅडम आणि ग्रामविकास अधिकारी श्री. प्रज्योत शंकर सुर्वे साहेब यांचे महत्वाचे योगदान लाभले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आगरी समाज वडवलीचे अध्यक्ष श्री.बळीराम जान्या कांबळे साहेब, तलाठी सजा वडवलीचे तलाठी श्री. करचे साहेब आणि वडवली गावचे जेष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्ते व सर्व  ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा