माणगाव - म्हसळा व्हाया खड्डेवाडी, माणगाव म्हसळा राष्ट्रीय महामार्ग झालाय खड्डेमय...

प्रतिनिधि, म्हसळा
पुणे-दिघी राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्याच्या माणगांव-दिघी या पहिल्या टप्प्यातील ५५ कि.मी.चे काम सुरू आहे. यामधील माणगाव म्हसळा हा केवळ ३० कि.मी. मार्गाचा प्रवास हा प्रायव्हेट फोर व्हिल गाडीने किमान १ तास, तर एसटीने तब्बल दीड तासाचा झाला आहे. पूर्वी हाच मार्ग केवळ पाऊण ते एक तासाचा होता. सर्वसाधारण प्रवाशांचे वेळेचे प्रचंड नुकसान होत आहे ते केवळ रस्त्यातील खड्यामुळे रस्त्यावर मोजन्या एवढे खड़े
नसून संपूर्ण रस्ताच खड्यात गेला असल्याची स्थीती आहे.
रस्त्यावरील खड्यांमुळे प्रवाशांना पाठ, मणका, कंबर असे सर्व प्रकारचे आजार सुरु झाले आहेत. वाहनांचे पार्टळी खिळखिळे होत आहेत. नव्याने रस्त्याचे काम काँक्रीटचे होणार आहे. ते नियमाने होऊ दे, रस्त्यावरील खड़े बुजविल्याशिवाय पुढील काम करू नये, खड़े बुजविताना सेटींग होईपर्यंत दिघी पोर्टची अवजड वाहने बंद ठेवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा