“पद्मावती” चित्रपटावर बंदी घाला , कोकण विभाग क्षत्रिय राजपूत समाजाची मागणी

छाया सुशील यादव
म्हसळा : सुशील यादव
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या “पद्मावती” या चित्रपटातून विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी , अशी मागणी काल (दि. २० नोव्हेंबर) कोकण विभाग क्षत्रिय राजपूत समाज , म्हसळा शाखेकडून मा. जिल्हाआधीकारी, रायगड यांच्या नावे तहसीलदार, म्हसळा यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली.  संस्कृतीचे विकृतीकरण करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ हा चित्रपट इतिहासाची मोडतोड करून अतिरंजितप्रकारे बनविला आहे. त्यामुळे खरा इतिहास बाजूला राहून चुकीचा इतिहास लोकांसमोर आणला जात आहे. या चुकीच्या पद्धतीने बनविलेल्या चित्रपटामुळे सामाजिक तेढ निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने जनप्रक्षोभ लक्षात घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. कोकण विभाग क्षत्रिय राजपूत समाजात रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यां ठिकाणी या प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती म्हसळा राजपूत समाजाचे अध्यक्ष खंगारसिंग राजपूत यांनी दिली. यावेळी म्हसळा राजपूत समाजाचे अध्यक्ष खंगारसिंग राजपूत ,जब्बारसिंग राजपूत, नारायणसिंग राजपूत , म्हसळा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, नंदू शिर्के, दीपाल शिर्के बाबू बनकर, कृष्णा म्हात्रे , चेतन जैन यांच्या समवेत अनेक राजस्थानी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.   
छाया : सुशील यादव

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा