छाया - सुशील यादव
म्हसळा- सुशील यादव
प्रत्येकाच्या जीवनात प्रेम वात्सल्यरुपी"आई"ला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार देणाऱ्या आपल्या शाळेला आहे या स्तुत्य भावनेतून म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलमधे सन1989 साली इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी वर्गाने तब्बल 28 वर्षांनी सोशल मीडियाचे माध्यमातून एकत्रित येत न्यु इंग्लिश स्कूल ला भेट देऊन या शाळेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.शाळेचे माजी विद्यार्थी दिलखुष जैन,संजीव उर्फ मुन्ना टिके यांनी तत्कालीन वेळेच्या माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचा व्हाट्स अॅप ग्रुप बनवला होता या माध्यमातून नितीन बोरकर,मनीषा पानसरे(गांधी),योगेश करडे, मंगेश कदम यांनी पुढाकार घेतल्याने स्नेहसंमेलन कार्यक्रम करण्याचा योग आला.दिनांक 19 नोव्हेंबर रोजी न्यु इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रमाला शाळा प्राचार्य श्री माळी सर,चेअरमन समीर बनकर,पर्यवेक्षक बामणे सर,श्री वायकर,विध्यार्थी प्रतिनिधी सतीश जंगम,विध्यार्थीनी प्रतिनिधी मनीषा गांधी,कपीलकुमार शिंदे,नितीन बोरकर,जितेंद्र पाभरेकर,प्रसाद कदम,महेश पोतदार,रेखा जैन,(ओसवाल),सुजाता करंबे(वायकर),योगेश करडे,कृपा केळकर(आठवले),आशा सावंत(घरत),मीनाक्षी खराडे,अनिता भुसाने,अर्चना पाटणकर,वर्धन वडके,महेश रणदिवे,प्रदीप कळस,मनिषा बोरकर,बाबु चाळके,दिलीप भायदे,शाळा कर्मचारी देवा,जंगम,आदी मान्यवर उपस्थित होते.
माझी शाळा,मी शाळेचा विध्यार्थी ह्या स्तुत्य हेतुने आपण ज्या शाळेत शिक्षण घेऊन आज एक आदर्श नागरिक घडत आहोत ते केवळ आणि केवळ आपल्या शाळेमुळे म्हणुनच माजी विद्यार्थी वर्गाने संघटीत होऊन शाळेत आपल्याला ज्ञानदान करून संस्कारित केले त्या शिक्षकांची आठवण आणि शिक्षण घेतलेल्या संस्थेचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना माजी विध्यार्थी सतीश जंगम,अशोक काते,सुजाता करंबे,जितेंद्र पाभरेकर,कृपा केळकर,मनीषा गांधी,मंगेश कदम यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले.28 वर्षानंतर शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेबद्दल प्रेम,आपुलकी,जिव्हाळा ठेवतात हे वाखाण्याजोगे असुन हा उपक्रम आदर्शवत असुन नवीन पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे मत शाळा प्राचार्य माळीसर,चेअरमन समीर बनकर यांनी व्यक्त केले.शाळेच्या वतीने उपस्थित सर्व माजी विद्यार्थी वर्गाचे प्राचार्य माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कपीलकुमार शिंदे यांनी प.पु.बापुजी साळुंखे यांचे पुतळ्याचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.प्रास्ताविक मंगेश कदम सर यांनी तर आभार जितेंद्र पाभरेकर यांनी मानले.दोन दिवस संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनाचे श्री योगेश करडे, नितीन बोरकर, मनिषा गांधी यांनी सुंदर व नेटके आयोजन व व्यवस्थापन केले.
Post a Comment