चिरे भरलेला ट्रॅक्टर घुसला नागरी वस्तीती : सुदैवाने जीवितहानी नाही...


म्हसळा : प्रतिनिधी,
ईदगा मैदान येथून स्टेट बँक ऑफ इंडियाकडे येण्यासाठी अंतर्गत रस्त्याच्या मधोमध तीव्र डोंगर उतारावर चिरे भरलेला ट्रॅक्टरला अप- घात झाल्याची घटना गुरुवारी (दि.२३) दुपारी ३.३० वाजता घडली.अपघाती टॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून टॅक्टर रस्त्याशेजारील असलेल्या नागरी वस्तीतील इब्राहिम वस्ता (बैलगाडीवाले) यांच्या घरासमोरील गटारात घु- सला. सुदैवाने वस्ता यांचे घर बंद होते, घरासमोरील गोठ्यात बैलही नव्हते. त्यावेळी या रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली; अन्यथा ज्या उतारावर हा ट्रॅक्टर माल वाहतूक करीत होता तो डोंगर उतार पाहता मोठा अपघात घडला असता. अपघात झालेला टॅक्टर दगड खाणमालक चव्हाण यांच्या मालकीचा असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. वस्ता यांच्या घराशेजारी चालू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी टॅक्टरमधून जांभा चिरे वाहतूक करीत असल्याचे समजते. वस्ता यांच्या घरासमोरील भेजला चिटकूनच असून त्यावर स्लॅब असल्याने अपघाती ट्रॅक्टरची पुढील चाके खोलवर अडकून राहिल्याने वित्तहानी टळली आहे. अपघातात वित्त व मनुष्यहानी न झाल्याने याची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे माहितीअंती समजते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा