मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे,
मुरुड तालुक्यातील डोगराळ भागात वसलेले म्हालोर गाव असून येथील रस्ता गेली अनेक वर्षांपासून खराब होता.हा सदरचा रस्ता चांगल्या स्वरूपात व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वावडुंगी ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांनी केली होती.याबाबत स्थानिक आ. पंडित पाटील यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली होती.सदरील रस्ता हा पाच किलोमीटर अंतराचा असून याला दोन कोटी लाख रुपये खर्च होणार आहेत.सदरचे काम सिद्धिविनायक कॉन्स्ट्रक्शन करणार आहेत.आम दाराच्या पाठपुराव्यामुळेच सदरचा रस्त्याला मंजुरी व निधी उपलब्ध झाल्याने येथील ग्रामस्थांनी आमदार पाटील यांचे जंगी स्वागत करून फटाक्याची आतषबाजी केली. या रस्त्याचे भूमिपूजन आम दार पंडितशेट पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत,वावडुंगी सरपंच हरिचंद्र भेकरे,जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, तुकाराम पाटील,अजित कासार,मंगेश अदावडे,धर्मा हिरवे,दशरथवाजे,रामचंद्र कासार,कम लाकर भाने,पांडुरंग जाधव,म्हालोर गाव अध्यक्ष सखाराम भेकरे,श्रीकांत वारंगे,विकास दिवेकर,माजी सभापती चंद्रकांत क्रमाने,विजय गीदि आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार पंडितशेट पाटील म्हणाले कि, या गावाची गेल्या अनेक दिवसापासून रस्ता करण्याची मागणी होती,या रस्त्यासाठी मला ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे सहकार्य लाभले त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो.गावाचा विकास हा शेतकरी कामगार पक्षच करू शकतो आज या रस्त्यामुळे हे सिद्ध झाले आहे.विकास कंन्साठी माझा सतत पाठपुरावा असतो.लवकरच तालुक्यातील सर्व रस्ते चांगल्या स्वरूपात होतील.शीघ्र पुलाचा हि भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार आहे.मुरुड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही कटिबद्ध असून विकास कामाचा झंझावात हा असाच सुरु राहणार असल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.
Post a Comment