म्हसळा : प्रतिनिधी
रायगड जिल्हा प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ अध्यक्ष श्री. शिवाजी शिंदे यांचे आदेशान्वये रविवार दिनांक २६/११/२०१७ रोजी सकाळ ११.३० वा स्थळ-रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था पेण सभागृहामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचय यांच्या वेतनश्रेणी याचिकेची अंतिम सुनावणी बाबत तातडीची सभा आयोजित केली आहे या दोन्ही याचिकेच्या लढया बाबत मार्गदर्शन करणेसाठी महासंघाचे राज्याध्यक्ष भरतजी जगतापसर व कार्याध्यक्ष श्री. नंदकुमार खडकेसर उपस्थित राहणार आहेत. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचय यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. तसेच आपल्यावर होणाच्या वेतनश्रेणी त्रुटी याचिकेत न्याय मिळविणेसाठी व शासन नोकर कपातीचा दि.२३/१०/२०१३ च्या आकृतीबंधात आपल्या जिल्ह्यातील कार्यरत प्रयोगशाळा परिचय कर्मचान्यांवर अन्याय होवू नये म्हणून जिल्हा महासंघाकडे आपली नावे नोंदविणे आवश्यक आहे. कार्यरत प्रयोगशाळा कर्मचान्यांची यादी दोन्ही याचिकेसाठी मुंबई उच्च न्यायालयांत सादर करणे आवश्यक आहे. जेणे करून कोणीही आर्थिक लाभापासून वंचित राहू नये व प्रयोगशाळा परिचय यांचेवर अन्याय होवू नये यासाठी राज्यसंघाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष जावेद काजले,प्रकाश मोहिते, खजिनदार संजीव गोरेगांवकर यांनी केले.
Post a Comment