प्रतिनिधी,
तोंडसुरे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक शौचालाय दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी म्हसळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.एन.दिघिकर यांनी मानवी विष्टेच्या नियोजन व परिसर स्वच्छ कसे राखावे या बाबत सांगताना पुढे म्हणाले की संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर केला आहे.. आज भारतात कित्येक स्त्री-पुरुषांना
असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्यामुळे रोगराई फैलावत आहेत.महाराष्ट्र संताची भूमी आहे. सर्वप्रथम गाडगेबाबा यांनी समाजाला करुन दिले.त्यांनी स्वतः हातात झाडू घेउन रस्त्यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ केली. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होते. आजही डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छतेचे महत्व सांगुन प्रत्याक्षात कार्य करत आहे .भारतातील शौचालयाची स्थिती,दिल्लीच्या संशोशन संस्थेने केलेल्या अहवालात म्हटले की,भारतात ३२३५ गावात शौचालये आहेत.परंतुत्यातील ४३%लोक शौचालय वापर करतच नाहीत.इशान्य भारतातील ४५ टक्के लोक शौचालयाचा वापर करत नाहीत. सरकारी धोरणानुसार भारतात ११० मिलियन शौचालयांची आवश्यकता आहे.
Post a Comment