श्रीवर्धन शहरातील पेशवे मंदिर नूतनीकरणाला व संग्रहालयाला आम सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाला यश मुख्यमंत्री देवेँद्र फडणवीस यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद...

श्रीवर्धन, प्रसाद नाझरे
श्रीवर्धन शहराची ऐतिहासिक ओळख असलेले श्रीमंत पेशवे यांचे जन्म स्थान श्रीमंत पेशवे मंदिर म्हणुन प्रख्यात आहे .पुरातन वास्तु जीर्ण अवस्थेत आली असुन बाळाजी पेशवे व वाडा याच्या पलीकडे येथे काहीच नसल्याने  पर्यटनासाठी आलेले पर्यटक नाराज होवुन जातात. श्रीवर्धनचा सर्व बाबतीत विकास साधताना पेशवे मंदिराच्या नूतनीकरण व संग्रहालय करण्याचा चंग श्रीवर्धनच्या विकासाचा विडा उचलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आम. सुनील तटकरे यांनी बांधला होता. या संदर्भात गेले अनेक वर्ष आम .सुनील तटकरे स्वताहुन पाठ पुरावा घेत होते .त्यांच्या पाठपुराव्याला आज मुहूर्त स्वरुप लागले .आम .सुनील तटकरे यांच्या आग्रहाला मान देवून राज्याचे मुख्यमंत्री देवेँद्र फडणवीस यांनी सह्याद्री अथीती ग्रूह येथे या संदर्भात बैठक आयोजित केली होती .या बैठकीला रायगड चे जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी , प्रधान सचिव मनीषा म्हैसकर , पुरातत्व विभागाचे अधिकारी , सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता सतपूते , श्रीवर्धन नगरपालिका मुख्याधिकारी अर्चना दिवे , यूवानेते अनिकेत भाई तटकरे , उपनगराध्यक्ष जितेँद्र सातनाक , डॉ अबु राऊत , लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारि सभासद , शहरातील नागरिक उपस्थित होते , या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामाला सकारात्मक प्रतिसाद देत आम .सुनील तटकरे यांना पेशवे मंदिराच्या नूतनीकरण व संग्रहालयाला मंजूरी देवून निधी  उपलब्ध करून देण्याचे श्रीवर्धन वाशिँयासमोर आश्वासन दिले .गेले अनेक वर्षाचे श्रीवर्धन वाशियाँचे स्वप्न पूर्ण होणार असुन  श्रीवर्धन वाशियाँमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले असून सदर बैठकिचा व्रुतान्त श्रीवर्धन शहरात समजल्या नंतर  आम , सुनील तट करे व युवा नेते अनिकेत भाई तटकरे  यांचे आभार मानण्यासाठी नागरिक फोन करीत होते , सदर कामासाठी सुमारे 18 कोटी रूपयाचे अधयावत नूतनीकरण व संग्रहालय होवून श्रीवर्धन शहराचा मान उँचवनार त्याच सोबत पर्यटकांची संख्या वाढणार् हे निछित असल्याने  श्रीवर्धन ची जनता आम , तटकरे साहेबांना धन्यवाद देत आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा