श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन येथे स्मारक उभारण्याबाबत शासन सकारात्मक....

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन  येथे स्मारक उभारण्याबाबत शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुनील तटकरे आणि प्रशांत ठाकूर यांच्या शिष्टमंडळास दिले.
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे स्मारक श्रीवर्धन (जि. रायगड) येथे उभारण्याच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे श्री. तटकरे तसेच श्री. ठाकूर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस नगविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, श्रीवर्धनचे उपनगराध्यक्ष जितेंद्र उर्फ बाळासाहेब सातनर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना दिवे यांच्यासह लक्ष्मी-  नारायण देवस्थानचे ट्रस्टी नारायण टेमकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा