दिघी खाडीत कचऱ्याचे साम्राज्य...


दिघी : वार्ताहर गणेश प्रभाले
कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतात निळेशार समुद्रकिनारे, रम्य, शांत वातावरणातील स्वच्छ किनारे, पांढरी शुभ्र वाळू. मात्र, दिघी गावानजीक असणा-या किनारपट्टीवर सर्वत्र कचरा साचल्याने परिसरात दुगधी पसरली आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, गावाचा विस्तार मोठा आहे. दिघी गावामध्ये प्रवेश करताच फेरीबोट प्रवास करण्यासाठी जेट्टीकडे जाण्याचा मार्ग या किनारपट्टी लगत असल्याने सर्वत्र कचरा साचल्याचे दिसून येत आहे. मुरुड-जंजिरा व श्रीवर्धन या दोन तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ व पर्यटक मोठ्या संख्येने येथील जलवाहतुकीने प्रवास करीत असतात. मात्र, परिसरात पसरलेल्या दुर्गधामुळे येणाच्या जाणाच्या नागरिक व पर्यटकांना या रस्त्याने नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. खाडीकिनारपट्टीवर वाहून आलेला कचरा व मोकाट जनावरे मुक्त संचार करीत असल्याने परिसरात बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. दिघी येथील पर्यटनाच्या दृष्टीने ही भयावह बाब असून, वाढते प्रदूषण मानवी जीवनासह सागरी जीवसृष्टीसही अपायकारक ठरणार आहे. याबाबत वेळोच जनजागृती व उपाययोजना होणे गरजेचे बनले असून किनारपट्टीवरील
स्थानिक जनतेने जागरुक होणे महत्त्वाचे ठरणार आहे. नयनरम्य, निळेशार, स्वच्छ समुद्र किनारे, वालू यामुळे कोकणातील सागरी किनारे पर्यटकांना भुरळ पाडत आहेत. मात्र, दिघी येथील आजूबाजूच्या परिसरात स्थानिकांकडून टाकण्यात आलेली कचरा किनारपट्टीवर साचला जातो, काही ठिकाणी कचर्याचे ढिग पहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर हा कचरा किनारपट्टीवर संपूर्णतः विखुरलेला निदर्शनास येत आहे. यामध्ये काटेरी झुडुपे, फाटलेले कपडे, प्लास्टिक पिशव्या, चप्पल, खाण्याच्या वस्तूची वेष्टने, डब, काचेचे बाटल्य, ट्यूब काचेच्या बाटल्या, धर्माकॉल व इस मानवनिर्मित टाकाऊ वस्तूंचा या कच-यामध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक जनतेसह मच्छिमार व पर्यटकांवर होतो. दिघी येथील विकसित बंदर दिघी पोर्ट हे चर्चेत आहे. पोर्टकडे जाण्यासाठी दिघी गावाला जोडून हाच रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर शाळेतील मुले, स्थानिक नागरिक व पोर्ट कर्मचारी यांचा सातत्याने होत आहे. मात्र, रस्त्याला कचरा साचल्याने परिसरात दुर्गणी पसरली आहे. त्यामुळे दिघी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती आहे. त्यामुळे दिघी किनारा स्वच्छतेसाठी येथील सेवाभावी संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्यासह नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. कारण समुद्र केवळ मच्छिमारांसाठीच फायद्याचा नसून, हया संतुलन, सागरी पर्यावरण, अर्थकारण, व्यापार, दळणवळण  पर्यटनदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. त्याला वाचविण्यासाठी शासनासह जनतेने उपाययोजना आखुन गम्भीर्यने विचार करून किनारा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने कोकणात सौंदर्याची उधळण केली आहे. परंतु वाढत्या प्रदूषणाचा विचार करता येथील निसर्ग सौंदर्यमध्ये बाधा येऊ लागली आहे. याचा परिणाम पर्यटनाबरोबरच पर्यावरणावरही होत आहे. त्यामुळे पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत 'स्वच्छ किनारे' मोहीम राबवून किमान्यांवर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा