दांडगुरी : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील अपूर्ण असलेल्या काही पाणी पुरवठा योजनांचा पाढाच ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या समोर मांडला.श्रीवर्धन तालुक्यातील पाणी पुरवठा विभागाची आढावा सभा कुणबी समाज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी सदर सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या समवेत तहसीलदार जयराज सूर्यवंशी,गट विकास अधिकारी गमरेमॅडम,विस्तार अधिकारी,पाणी पुरवठा उप अभियंता युवराज गागुडे, चिमाजी राव हंबीर, किशोर नागे,श्रीवर्धन एस टी डेपो मॅनेजर रेश्मा गाडेकर,महावितरण कंपनीचे महेंद्र वाघपैंजण,वश्रीवर्धन पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी,उपसभापती बाबुराव चोरगे,जिल्हा परिषद सदस्या सायली तोडलेकर,प्रगती अदावडे, शिवसेना उप तालुका प्रमुख सुकुमार तोडलेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, तालुका उप अध्यक्ष राष्ट्रवादी सुचीन किर,युवक अध्यक्ष सिद्धेश कोसबे,यांच्या सह पाणी पुरवठा विभाग व पंचायत समि ती कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या वेळी अध्यक्षा अदिती तटकरे यांनी आवर्जून सांगितले की ग्रामीण भागतील सर्व ग्रामस्थांना स्वछ पाणी मिळणे ही फार मोठी गरज आहे.त्यामुळे संबधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने जबाबदारी समजून जे जे अर्धवट अवस्थेत रखडलेल्या तालुक्यातील पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर सुरळीत करून नागरिकांना सुस्थितीत पाणी पुरवठा सुविधा पुरविणे हे शासनाचे काम आहे. त्या साठी तालुक्यात काम करणारे अधिकारी,कर्मचारी व जिल्हा परिषद मधील अधिकारी व अन्य संबधीत कर्मचारी यांनी आपपल्या जबाबदारीचे भान ओळखून कामे करणे गरजेचे आहे.या अर्धवट अवस्थेत असलेल्या योजनेमधे जर कोणी अधिकारी वर्ग व कोणी ठेकेदार कामचोर पणा करत असले तर त्याच्यावर योग्य ती करवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी दिला. पाणी पुरवठा विभाग आढावा सभेला उपस्थित ग्रामस्थांकडून बडघर | गौळवाडी या ठिकाणी भारत निर्माण योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना सन ते या साली ही योजनेला मंजूरी मिळाली सदर कामाची अंदाजे रक्कम दहा लक्ष असुन यामध्ये योजने अंतर्गत अंदाजे दोन ते तीन किलोमीटर पाईप लाईन व एक साठवण टाकी एवढ काम झाले असुन या मोबदल्यात गाव पातळीवरील ग्रामीण पाणी पुरवठा कमिटीने दहा लक्ष मधील लक्ष हजार रुपये ग्रामीण पाणी पुरवठा कमिटीने सदर रक्कम काढून सदर अद्याप योजना अर्धवट अवस्थेत असल्याने या बाबतीत वडघर गावचे समाजसेवक संदीप रिकामे यांनी सभागृहाचा लक्ष वेधून जिल्हा परिषद अध्यक्षा समोर या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे थेट आरोप सभागृहात केले. त्या वर अध्यक्षा अदिती तटकरे यांनी संबधीत कामांची चौकशी करण्याचे आदेश पाणी पुरवठा उप अभियंता युवराज गागुडे यांना दिले तर तालुक्यातील वडशेत वावे, वडवली, शिस्ते, भोस्ते, मरळ, गडबवाडी व तालुक्यातील प्रलंबित असलेल्या योजना व पूर्णत्वाकडे गेलेल्या योजनेची पाहणी करून अहवाल लवकरच जिल्हा परिषदेला पाठवण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी उप अभियंताना दिले.तर तालुक्यात वेगवेगळ्या भेडसावणाच्या सुखसुविधा विषयी देखील चर्चा करण्यात आली.
Post a Comment