सुवर्णगणेशाचे सोने ट्रस्टीकडे करणार सुपूर्द , मुख्यमंत्र्यांचे आश्वासन...

प्रतिनिधी,
राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्णगणेशाचे सोने शासनाकडे जमा आहे. हे सोने शासनाकडून ट्रस्टीकडे सुपूर्द करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

आमदार सुनील तटकरे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर मुख्यंमत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यावेळी दिवेआगरचे मंदिरातील ट्रस्टी विजय पटवर्धन उर्फ लालाभाई तसेच नरेश अडूळकर, पत्रकार संजय मांजरेकर व सचिन राऊळ उपस्थित होते. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्णगणेश दरोडा खटल्याचा निकाल नुकताच लागला. त्यानुसार संबंधित गुन्हेगारांकडून पोलिसांनी हस्तगत केलेले १ किलो ५५० ग्राम वजनाचे सुवर्णगणेशाचे सोने न्यायालयाने मिंटमध्ये ठेवण्याचा आदेश दिला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा