म्हसळा म्हसळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता म्हसळा कन्या शाळा येथे संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री.नितीन माळीपरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी तालुक्यातील उपक्रमशील व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
श्री.संतोष शेवाळे (जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार),श्री.जयसिंग बेटकर (युवा भूषण पुरस्कार)श्री.संदीप जाधव (शिक्षणाची वारी निवड)श्री.वैभव सूर्यवंशी (राष्ट्रीय पर्यावरण साहित्य पुरस्कार)श्री.बशिर उल्डे(डायट निवड)श्री.इकबाल कौचाली(उर्दू राज्यस्तरावर निवड)श्री.नितीन गर्जे(पेण पतपेढी व्हॉईस चेअरमन पदी निवड)या सर्वाना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच तालुक्यातील मांदाटणे शाळेचे शिक्षक श्री.नरेश सावंत यांची कन्या नुपूर सावंत हीचा 10 वीत तालुक्यातून प्रथम क्रमांक आणि भाला फेक स्पर्धेत विभाग स्तरावर निवड झाल्याबाबत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सर्व सत्कारमूर्तीनी आपल्या भावना व्यक्त करताना संघटनेच्या कार्याचा गौरव केला व
संघटनेच्या कामाबाबत तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर सभेमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तालुका अध्यक्षांनी वेळोवेळी संघटनेकडून केलेल्या कामांबाबत प्रास्ताविक केले.ऑनलाईन कामावर बहिष्कार,जुनी पेन्शन,mscit वसुली रद्द करणे बाबत,या विषयांवर संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगितले.तसेच हे विषय जिल्हा व राज्य स्तरावर प्रभावी पणे मांडण्यासाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.निजापकर सर व राज्य अध्यक्ष श्री.राजेश सुर्वे सर हे प्रयत्नशील असल्याचे तालुकाध्यक्षांनी सांगितले.
या सभेसाठी तालुका कार्यकारिणी राजेश खटके,महादेव पवार,नरेंद्र ढेरे,मकरंद कंचार,जलकोटे, तसेच अलिबाग पतपेढी संचालक नरेश सावंत,पेण पतपेढी संचालक नितीन गर्जे व संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.
Post a Comment