वडिलोपार्जित राजकीय वारसमुळेच मी जिल्हा परिषदेची अध्यक्षा - आदिती तटकरे

म्हसळाः प्रतिनिधी,
सातत्याने १५ वर्षे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री म्हणुन कार्यरत असलेले माझे वडील प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब उच्च शिक्षणासाठी पुणे येथील फर्गुसन कॉलेजमध्ये गेले होते परंतु वैयक्तिक कारणास्तव त्यांनी तेथील शिक्षण पूर्ण न करता राजकीय व सामाजिक वारसा जोपासला त्यांचाच आदर्श घेत मी माझे शिक्षण पुर्ण होताच राजकीय क्षेत्रात झेप घेतल्याने अर्थात वडिलोपार्जित राजकीय वारसा जोपासल्याने आज मी रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्ष होऊ शकले हे केवळ आई वडिलांचा आशीर्वाद,जनतेचा प्रेम आणि शाळेच्या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानदानामुळेच असे मनोगत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे यांनी म्हसळा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन कार्यक्रमात व्यक्त केले. त्या पुढे बोलताना शालेय जीवनात विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला नसला तरी विज्ञानाची कास कधीही सोडली नाही पण शिक्षणाची आवड आणि वाचन कधी कमी केले नाही असे आवर्जुन सांगितले.
म्हसळा तालुका विज्ञान प्रदर्शन २०१७-१८ चे उदघाटन अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांचे समावेत सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर,जि.प.सदस्य बबन मनवे,जि.प.सदस्या धनश्री पाटील,ज्येष्ठ नेते अलिशेठ कौचाली, पं.स.सदस्य संदिप चाचले, पं.स.सदस्या छाया म्हात्रे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, प्रमुख पाहणे फर्गुसन महाविद्यालयाचे प्रोफ़ेसर मनोज कुमार कुकडे, माजी सभापती तथा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाझीम हसवारे, नगराध्यक्षा कविता बोरकर, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, आइडियल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मेहमूद अली वकील, माजी जि.प.सदस्या वैशाली सावंत, महिला अध्यक्ष रेश्मा काणसे,जिल्हा सचिव व्यंकटेश सावंत,
रियाज घराडे, रियाज फकीह, अनिल बसवत, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष शरीफ हसवारे, गणित-विज्ञान मंडल इक़बाल कादिरी, सर्व केंद्र प्रमुख, साधन व्यक्ति,मुख्याधापक,शिक्षक, विद्यार्थी,आदि मान्यवर उपस्थित होते. फर्गुसन महाविद्यालयाचे प्रोफेसर मनोज कुमार कुकडे यांनी विज्ञान या मुख्य विषयाला अनुसरुन पर्यावरण या विषयाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सांगितले की मी माझ्या शालेय जीवनात विज्ञान प्रदर्शनात कधीही भाग घेतला नसला तरी विज्ञानाची कास मात्र आजपर्यंत सोडली नाही कारण विज्ञान या विषयामध्ये जगाची निर्मिती करण्याची क्षम ता आहे.विज्ञानामुळे जगाची प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 
नवीन टेक्नोलॉजी चा वापर करून आइडियल च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय उत्कृष्ट प्रकारे उदघाटन केल्याने त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.मला माझ्या वडील आम.सुनील तटकरे यांच्या मुळेच जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे मी तुमचे कौतुक करण्यास पात्र ठरले याचा म ला सार्थ अभिमान असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.मी माझ्या गुरुजनांची विशेष
ऋणी आहे कारण मी राज्याच्या मंत्र्याची मुलगी असतानाही त्याची हवा माझ्या कानात जाऊ दिली नाही.माझ्या जीवनाच्या यशाचे संपुर्ण श्रेय आई-वडिलांनंतर मी माझ्या गुरुजनांना देणे निश्चितच महत्वाचे मानत असल्याचे सांगुन उद्याचे भवितव्य घडविण्याची महत्वाची जबाबदारी ते पेलत आहेत.शिक्षकांना अनेक अडीअडचणी असतानाही गटशिक्षणाधिकारी गजानन साळुखे यांनी तालुक्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत ठेवला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी मोरबा येथील एका २१ वर्षाच्या तरुण सिव्हिल इंजीनिअर कुमार हर्णेकर यांनी राबविलेला स्ट्रीट लाइट घरी बसून बंद करण्याच्या उपक्रमाचे कौतुक करून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतिमध्ये राबविण्याचा विचार असल्याचे सांगितले.त्याचप्रमाणे तिन-चार वर्षाच्या लहान कोवळ्या मुलाला आज संपुर्ण मोबाइल ऑपरेट करता येतो ही बाब अत्यंत गंभीर असून यापासून त्या मुलाच्या जीवनावर दुषपरिणाम होण्याची भीती त्यांनी याप्रसंगी व्यक्त करताना मागील काही काळात पोकोमन सारख्या घातक खेळापासून झालेले गंभीर आणि हानिकारक उदाहरणे दिली,शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कधीही राजकारण न आणण्याचे आश्वासन त्यांनी शेवटी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा