म्हसळा प्रेस क्लबचा स्तुत्य उपक्रम, म्हसळा तालुका आय.टी.आय प्रशिक्षणार्थीना देण्यात आले टी.टी.चे इंजेक्शन....


म्हसळा- सुशील यादव
म्हसळा प्रेस क्लब आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळाचे संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय.टी.आय.) म्हसळा आगरवाडा येथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी वर्गाची आरोग्याची काळजी म्हणुन टी.टी.(धनुर्वात) प्रतिबंध लसीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्रेस अध्यक्ष अशोक काते, प्राचार्य पी.एम.बिरार, पत्रकार बाबु शिर्के, तालुका आरोग्य सहाय्यक महेश पाटील, विजतंत्रि एस.ए.पाणींद्रे, संधाता के. बी.पाटील सर, जोडारी पी.डी. कांबळे सर, शिवण कर्तन श्रीमती के.एस.बाकडे, पी.डी.घरत, एस.एस. कौलकर, आर.एन.पालकर,आरोग्य कर्मचारी अरुण कोल्हे, आरोग्य सेविका रेश्मा पाटील,रिना धनावडे,शितल भगत,प्रणाली कांबळे,वैशाली जाधव आणि प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
म्हसळा तालुका औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्लंबर,वेल्डिंग,फिटर,शिवणकला, इलेक्ट्रेशन, इलेक्ट्रॉनिक्स असे ट्रेड असुन येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 98 विध्यार्थी आणि 17 कर्मचारी यांना या लसीकरणाचा लाभ देण्यात आला.या ना त्या कारणामुळे प्रशिक्षण घेताना काही ना काही शारिरीक इजा होत असते त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणुन महिन्या सहा महिन्यात टी.टी.लसीकरण आवश्यक आहे ही गरज ओळखुन एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना शासनाची मोफत आरोग्य सेवा मिळावी ह्या स्तुत्य हेतुने प्रेस क्लब आणि आरोग्य केंद्र यांचे माध्यमातून वरील उपक्रम करण्यात आल्याचे जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी माहिती देताना सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य बिरारसर,प्रस्तावीक व सुत्रसंचालन पाणींद्रे सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा