दैनिक पुढारीचे पत्रकार महेश पवार यांची काल (दि.२३ नोव्हेंबर)
रात्री दुचाकी जाळण्याचा अज्ञात इसमाकडून प्रयत्न झाला. याबाबत सविस्तर
वृत्त असे की महेश दामाजी पवार, रा. बोरकर चाळ, कन्याशाळे शेजारी , म्हसळा
यांनी आपली होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम.एच.०६ बी.क्यू. २२०५
आपल्या खोली बाहेर सायंकाळी ८.३० वा. लावली होती. सकाळी जेव्हा पवार आपल्या
खोली बाहेर आले तेव्हा या मोटर सायकलची सीट ब्लेड ने फाडून टाकण्यात आली
होती व त्यावर रॉकेल टाकण्यात होते. तसेच पेट्रोल चा पाईप सुद्धा काढला
होता. परंतु सदर अज्ञात इसम हि मोटर सायकल न जाळटाच घटना स्थळावरून निघून
गेला. पवार यांच्या मोटर सायकल च्या आजू बाजूला तीन अन्य मोटर सायकली
होत्या मग इतर मोटर सायाकलीना कोणताही धक्का न लावता फक्त पत्रकार पवार
यांच्याच मोटर सायकल ला जाळण्याचा प्रयत्न का झाला ? हा प्रश्न आहेच.
अनेकदा पत्रकार निर्भीड पणे जनतेच्या समस्या वर्तमान पत्रात लिहित असतात.
परंतु हाच निर्भीड पणा पत्रकारांच्या जीवावर बेतला असल्याची अनेक उदाहरणे
आहेत. महेश पवार यानाहि याच रोषाचा सामना करावा लागला आहे हे सदर घटनेवरून
दिसत आहे. या घटने विरोधात पत्रकार महेश पवार यांनी पोलिसात तक्रार आहे.
याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध भा.द.वी. कलम ४२७ अन्वये
गुन्हा दाखल केला गेला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक
सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार प्रमोद कदम करीत
आहेत.
Post a Comment