डॉ .श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने केलेल्या स्वच्छता मोहिमेचा म्हसळा नगरपंचायत ला विसर, दुसऱ्याच दिवशी नगरपंचायत कार्यालयाच्या समोरच कचऱ्याचा ढीग

 छाया : सुशील यादव
डॉ .श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने केलेल्या स्वच्छता मोहिमेचा म्हसळा नगरपंचायत ला विसर, दुसऱ्याच दिवशी नगरपंचायत कार्यालयाच्या समोरच कचऱ्याचा ढीग
म्हसळा : सुशील यादव
२ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा तर्फे संपूर्ण म्हसळा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती मात्र या स्वच्छता मोहिमेचा म्हसळा नगरपंचायत ला मात्र लगेच विसर पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हसळा नगरपंचायत च्या कार्यालयासमोरील विहिरीजवळ कचऱ्याचा ढीग सकाळीच दिसू लागला. डॉ . श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या ६५० दास गणांनी संपूर्ण म्हसळा शहर चका चक केले होते. या मोहिमेत प्रतिष्ठान ला प्रोत्साहित करण्यासाठी म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, आदी अधिकार्यांनी आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांसहित सक्रीय सहभाग घेतला होता परंतु म्हसळा नगरपंचायत चे नगराध्यक्ष ,मुख्याधिकारी सहित एकही नगरसेवकाने या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला नाही. त्यातच स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हसळा शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने शहरातील नागरिकांनी म्हसळा नगरपंचायत विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक नगरपंचायत मध्ये सत्तेत येताना राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘राष्ट्रवादी ला एक हाती सत्ता द्या , म्हसळा शहराचा कायापालट करून दाखवितो’
असा प्रत्येक भाषणात उल्लेख केला होता परंतु वास्तवात राष्ट्रवादी ची सत्ता असलेली म्हसळा नगरपंचायत मात्र स्वच्छतेच्या बाबतीत फारशी गंभीर नसल्याचे या घटनेवरून दिसत आहे.
डॉ. श्री. नानासाहेब  धर्माधिकारी प्रतिष्ठान ने स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण राज्यात फार मोलाचे कार्य केले आहे. या स्वच्छता मोहिमेत नगर पंचायत चे नगराध्यक्ष , नगरसेवकांनी सहभाग घ्यायला हवा होता. निदान यापुढे तरी प्रतिष्ठान च्या या महान कार्याची पोच पावती म्हणून शहराच्या स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महादेव पाटील, माजी सभापती , पंचायत समिती , म्हसळा 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा