म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यातील तरुणांचा ही "संताप मोर्च्यात" सहभाग...


प्रतिनिधी,
म्हसळा-श्रीवर्धन तालुकाचे पदाधिकारीही काल मुंबईत झालेल्या संताप मोर्च्या मध्ये सहभागी झाले होते.
संपर्क तालुका अध्यक्ष -श्री.शेखरदादा सावंत,
म्हसळा तालुका अध्यक्ष-श्री.रविभाऊ पाष्टे , श्रीवर्धन तालुका उपाध्यक्ष -श्री.किरण खोपटकर तसेच मनसे पदाधिकारी -स्वप्नील डावरुंग , विजय घरटकर,वैभव चाळके,वैभव पाटील , नितीन उंडे,मंगेश शिंदे,आदी उपस्थित होते मोर्च्याचे तालुकाचे नेतृत्व  मनसे म्हसळा तालुका संपर्क अध्यक्ष श्री.शेखर दादा सावंत यांनी केले.
राज ठाकरे यांनी मात्र थेट पंतप्रधान मोदींवर निशाण साधून टीकेची झोड उठवली.  इतका थापाडा पंतप्रधान आजपर्यंत मी पाहिला नाही. इतक्‍यावरच न थांबता त्यांनी मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचाही हल्लाबोल केला. देशात आज मोदींविरोधात कोणी तोंड जरी उघडले तरी त्याला गप्प बसविले जाते.  रेल्वे स्टेशन परिसरातले फेरीवाले येत्या 15 दिवसात हटवले नाही, तर मनसे रस्त्यावर उतरुन मनसे स्टाईलनं फेरीवाल्यांना हटवेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. यावेळी राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध कायम असल्याचं ठणकावून सांगितलं. सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना रेल्वेमंत्रीपदावरुन हटवल्याचा आरोप राज यांनी केला.
तसंच बुलेटट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, असं राज म्हणाले.
मी साक्षीदार या न भूतो  न भविष्यती या धडक मोर्चाचा ... साधारण 3-4 लाख च्या वरती महाराष्ट्र  सैनिक उपस्थित होते.....अभिमान आणि गौरव आहे त्या क्षणांचा जे क्षण मी माझ्या प्रत्येकक्ष डोळ्यांनी पाहिले.... राज साहेब तुसी ग्रेट हो....! ! !
-श्री.शेखर सावंत, मनसे म्हसळा तालुका संपर्क अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा