मुद्रांक विक्रेत्यांचे सोमवारपासून काम बंद , तहसीलदाराना दिले निवेदन

छाया . सुशील यादव
म्हसळा : सुशील यादव
सरकारला कोट्यावधींचा महसूल मिळवून देणारे मुद्रांक विक्रेते( स्टँप व्हेंडर) आणि दस्त लेखनिकानी विविध मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर पासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत म्हसळा तालुका मुद्रांक विक्रेते संघटना तर्फे शुक्रवारी (दि.०६) म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. राज्य मुद्रांक विक्रेता संघटनेच्या शिष्ठमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मागण्यासंदर्भात चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर पासून मुद्रांक विक्री, दस्त लेखन , ई-चलन बनविणे आदी कामे बेमुदत बंद ठेवण्यात येतील असे या संघटनेचे म्हसळा तालुक्यातील प्रमुख रवींद्र दळवी यांनी सांगितले. या संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे  छापील मुद्रांक विक्री सुरु ठेऊन विक्रेत्यांना १० टक्के मनौती, ई-चलन प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते, दस्तलेखाकांमार्फत , दिवंगत मुद्रांक विक्रेत्यांच्या कुटुंबियांना वारसहक्काने परवाना देण्यात यावा. या वेळी रफिक चणेकर , संतोष जाधव, नरेंद्र इप्ते आदी मुद्रांक विक्रेते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा