रायगड (श्रीकांत बिरवाडकर) :
गेली अनेक वर्षे लेखन व पत्रकारितेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जनतेची सेवा करीत असलेले रायगड जिल्ह्यातील अत्यंत्य दुर्गम समजल्या जाणाऱ्या म्हसळा तालुक्यातील सकलप कोंड येथील सामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्ती म्हणजे जितेंद्र नटे. लहानपणापासूनच काहीतरी करण्याची धडपडी वृत्ती. समाजसेवा करण्याची आवड. तसे समाजसेवेचे धडे त्यांनी आई वडील व मामांकडून घरातूनच घेतलेले. त्यामुळे भविष्यात त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले ते म्हणजे मीडिया (वर्तमानपत्र). एका मीडिया एजन्सी मधून मग दैनिक नवाकाळ आणि दैनिक संध्याकाळ या वर्तमानपत्रातून काम केले. नंतर मुंबई लक्षदीप तसेच एशिअन फोटोग्राफी या मॅगझीन मध्ये सुद्धा काम केले. पुढे अनेक मीडिया कंपनीत काम करीत असताना "रायगड मत" नावाचे स्वतंत्र साप्ताहिक हि सुरु केले. सध्या ते संपादक म्हणून हि काम करीत आहेत. आपल्या विभागातील, तालुक्यातील,गावातील समस्या सुटाव्यात ह्या साठी ते नेहमी धडपडत असतात. पाणी प्रश्न, रस्ते प्रश्न, तसेच अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक प्रकाचे लेखन व सरकार कडे पत्रव्ययहारही केले आहेत. नोकरी निमित्त मुंबईत राहून हा माणूस आपल्या गावाकडील समस्यां आपल्या धगधगत्या लेखणीने सतत मांडत राहिला आणि त्याचेच परिणाम म्हणून अनेक समस्या सुटल्याहि. जहालवादी अशी ओळख असणारे पत्रकार म्हणून अनेक लोक त्यांच्याकडे संपर्कात असतात आणि त्यांच्या प्रयत्नाने अनेक कामे मार्गीही लागत असतात अशी जनताच सांगत असते.
पत्रकारितेच्या सोबत ते अनेक सामाजिक पदावरहि आहेत. आपल्या गावाचे म्हणजे सकलप कोंड गावचे अध्यक्ष आहेत. उत्कर्ष सेवाभावी संस्थेत सेक्रेटरी, भारतीय पत्रकार संघाचे सदस्य, मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य, भारतीय जनता पार्टी जिल्हा रायगड कोकण विकास आघाडी या राष्ट्रीय पक्षामध्ये सोशल मीडिया विभागासाठीही ते काम करतात. पत्रकारिते सोबत ते कला डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. "मी असाच" काव्य संग्रह तसेच "कुठे कुठे शोधू तिला", "हऱ्या - नाऱ्या झिंदाबाद" या सारखी नाटके हि त्यांनी लिहिले आहेत. गेली १५ वर्षे सतत कार्यरत असणारा हा अवलिया म्हणजे तरुणांसाठी आदर्शच मानावयास हवे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यापासून अनेकांनी त्यांना शुभेच्छा हि दिल्या. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Post a Comment