म्हसळा ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये सेनेचे पानिपत , १३ पैकी ८ ग्रामपंचायती शेकाप-राष्ट्रवादी कडे तर एक अपक्ष सरपंच ...




म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत १३ पैकी ८ ग्रामपंचायत मध्ये शेकाप-राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे त ४ ग्रामपंचायती काँग्रेस-सेना युतीकडे आल्या आहेत तर रेवली ग्रामपंचायतमध्ये अनपेक्षितपणे अपक्ष सरपंच निवडून आला आहे. ५ वर्षापूर्वी या १३ पैकी ८ ग्रामपंचायती सेनेकडे होत्या परंतु या निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेस बरोबर अनैसर्गिक युती करून देखील सेनेचे ३ सरपंच तर काँग्रेस चा फक्त १ सरपंच निवडणून आला आहे. यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सेनेचे पुरते पानिपत झाले आहे. तालुक्यात दोनही आघाडी व युतीने प्रतिष्ठेची केलेली खरसई व घोणसे ग्रामपंचायत निवडणुकी पैकी खरसई मध्ये शेकाप चे निलेश मांदाडकर हे  शिवसेनच्या महादेव कांबळे यांच्याकडून पराभूत झाले. तर घोणसे मध्ये राष्ट्रवादीच्या रेश्मा कानसे निवडून आल्या आहेत .  म्हसळा तालुक्यात एकूण १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.या पैकी १  ग्रामपंचायत आरक्षणामुळे पुढे ढकलण्यात आली तर फळसप व कणघर ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या होत्या.निवडणूक लागलेल्या ११ ग्रामपंचायतीपैकी देवघर ग्राम पंचायत चा सरपंच बिनविरोध निवडून आला व सदस्य पदासाठी निवडणूक लागली  होती . यामध्ये काळसुरी,देवघर,घोणसे,तोराडी,संदेरी,लेप फळसप, कणघर या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत तर खरसई,तोंडसुरे,कांदळवाडा , निगडी या ग्रामपंचायतीवर सेना-काँग्रेस युतीचे सरपंच विजयी झाले.रेवली ग्रामपंचायतीवर अपक्ष अनंत कांबळे हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. सेनेमधून राष्ट्रवादीमध्ये उडी मारलेले सेनेचे माजी विभाग प्रमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष संतोष पाखड यांच्या कुटुंबातील उमेद्वारांसाहित सर्वच उमेदवार कांदळवाडा ग्रामपंचायतीमध्ये पराभूत झाले व एक सदस्य वगळीता सरपंचपदासहीत सदाही सदस्य शिवसेनेचे निवडून  आले .  पंचायत समिती – जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी कडून सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेस शी सुत जुळविले. परंतु या विचित्र युतीचा निगडी व खरसई ग्रामपंचायत व्यतिरिक्त कुठेही फायदा झाला नाही. राष्ट्रवादी ने मात्र सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन मतदार संघात इंट्री केल्यापासूनची म्हसळा  तालुक्यातील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

सरपंच पदाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे :
१ ) फळसप  : सचिन मनोहर विचारे 
२ ) देवघर : अनिता सदू हिलम 
3) लेप :अंकुश पांडुरंग खडस 
४) काळसुरी : अरुणा संदीप नाक्ती 
५ )तोराडी : नजीरा हजवाने  
६ ) घोणसे : रेश्मा रमेश कानसे 
७) संदेरी : फारूक अजीम हजवाने 
८ ) रेवळी : अनंत हरी कांबळे ( अपक्ष ) 
९ ) कणघर : श्रीपद केरु धोकटे
१० )निगडी : महादेव भिकू पाटील( काँग्रेस आय ) 
११ ) खरसई : महादेव जर्नादन कांबळे ( शिवसेना )
१२) कांदळवाडा श्रीमती धोंडीबाई रामजी चाळके ( शिवसेना )
१३ ) तोंडसुरे , स्मीता सुधाकर जंगम ( शिवसेना)

 म्हसळा तालुक्यात आमच्या कार्याकर्त्यांसोबत शेकाप च्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यानेच हां मोठा विजय साकार झाला आहे.
नाझीम हासवारे , राष्ट्रवादी काँग्रेस ,म्हसळा तालुकाअध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा