श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने मारली बाजी...


गितेंच्या आदर्श सांसद दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

श्रीवर्धन -विजय गिरी
श्रीवर्धन पंचायत समिती मध्ये  अपयश आल्या नंतर अपयशाची सल मनात ठेवुन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे युवा नेते अनिकेत यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करुन ग्रामपंचायन्तिन्वर पक्षाचे वर्चस्व मिळवण्याचा विडा उचलला होता आज च्या निकालवरुन त्यांना आलेले यश हे त्यांच्या व कार्यकर्त्यांची मेहनत दिसुन येत आहे .श्रीवर्धन तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 14 ग्रामपंचायतीपैकी 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर काल घेण्यात आलेल्या 7 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये एका शेखाडी ग्रामपंचायतीचा अनुसुचित जमातीचा उमेदवारामुळे सरपंच पद रिक्त तर कुडगाव येथे गावाने नेमून दिलेला सरपंच बिनविरोध करण्यात आला तर कालच्या 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीपैकी दिवेआगर, वाळवटी, रानवली, सायगाव या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने निर्भेळ यश मिळविले तर शिवसेना पक्षाने साखरेणे या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व टिकवले आहे . केंद्रीय मंत्री ना. अनंत गिते यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या दिवेआगर ग्रामपंचातयीवर 11 पैकी 10 जागांवर यश मिळवित ग्रामपंचायत पक्षाच्या ताब्यात घेण्यात यश आले तेथील शिवसेनेला 1 च जागा जिंकता आली.
श्रीवर्धन मध्ये ग्रामपंचायत निवडणुक काल घेण्यात आली यामध्ये साखरोणे ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये अनंत कासरूंग 121 मते (राष्ट्रवादी) पराभूत विरूद्ध जागृती चालके 230 मते (शिवसेना) विजयी झाले त्याचप्रमाणे वाळवटी ग्रामपंचायत रिजवाना घरटकर 654 मते (राष्ट्रवादी) विजयी विरूद्ध तांबारे मेहजबीन 558 मते (शिवसेना) पराभुत, सायगाव ग्रामपंचायत लिलाधर रिकामे 458 मते (राष्ट्रवादी) विजयी विरूद्ध गणपत रसाळ 280 मते (शिवसेना) पराभुत, रानवली ग्रामपंचायत शेजल गजमल 359 मते (राष्ट्रवादी) विजयी विरूद्ध रूपाली जाधव 328 मते (शिवसेना) पराभुत, दिवेआगर ग्रामपंचायत उदय बापट 922 मते (राष्ट्रवादी) विजयी विरूद्ध सुनिल अडुळकर 655 मते (शिवसेना) व विजय तोडणकर 445 कॉंग्रेस आय पराभुत, अषी मते मिळाली असून कुडगाव ग्रामपंचायतीसाठी गावाने नेमुन दिलेल्या प्रमिला विनोद मेंदाडकर यांची यापुर्वी च बिनविरोध निवड झाली आहे तर वाळवटी षेखाडी ग्रामपंचायतीसाठी अनुसुचित जमाती आरक्षण असल्याने व येथे सरपंच पदासाठी सदर प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्याने हे पद रिक्त रहाणार आहे तर यापुर्वी 7 ग्रामपंचायती पुर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत यामध्ये सर्वे, कुडकी, वांजळे, चिखलप, जसवली, मेघरे, गुळधे या ग्रामपंचायतींचा समावेष आहे.
श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिवेआगर या सुवर्ण गणेशाचे पर्यटन स्थळ व केंद्रीय मंत्री ना अनंत गिते यांनी आदर्ष सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रतिष्टेची केली होती या ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी दस्तुर खुद्द प्रदेषाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रचार सभा घेतली होती तर युवानेते अनिकेत तटकरे यांनी देखील मोटार रॅली काढत काही ठिकाणी घरोघरी जावून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्य व सरपंच पदाच्या उमेदवारांचचा प्रचार के होता परंतू शिवसेना व कॉंग्रेस आय पक्षाने स्थानिक कार्यकर्ते यांच्या व्यतीरीक्त कोणीही मोठी नेते मंडळी यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला नसल्याचे समजते. याशिवाय विकासकामांच्या अजेंडयावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर दिवेआगरच्या जनतेने पुन्हा विष्वास दाखविला असल्याने ग्रामपंचायतीच्या एकुण 11 सदस्यपदाच्या जागांपैकी 10 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना पक्षाची यामध्ये मोठी पिछेहाट झाली असून त्यांना फक्त एकच जागेवर यश मिळविता आले. दिवेआगर प्रमाणे रानवली ग्रामपंचायत देखाल तालुक्यातील निकालाच्या दृष्टीने महत्वाची ग्रामपंचायत होती यामध्ये सरपंच पदासाठी चुरषीची लढाई होती यामध्ये देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महिला शेजल शैलेंद्र जाधव यांनी बाजी मारली रानवली येथील निवडणुकीत राष्ट्रीय कॉँग्रेस चे आयूब खान यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस ला पठिम्बा देवुन मेहनत घेतली होती .

श्रीवर्धन ग्राम पंचायती निवडणुकीतील निर्विवाद यश हे पक्षाच्या कार्यकर्त्यँच्या अपार मेहनती मुळे प्राप्त झाले असुन सर्व श्रेय कार्य कर्त्याँचे आहे . मतदारांनी विकास कामाची जाणीव ठेवत आम सुनील तट्करे व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला असल्याने मतदार व जनतेच्या विकासात आम्ही कमी पडणार नसल्याची प्रतिक्रिया निकालाच्या पार्श्व भूमीवर युवा नेते अनिकेत भाई तटकरे यांनी पत्रकारांना दिली .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा