2 दिवसात अंदाजे 9 लाख रुपये उत्पन्न बुडाले.
श्रीवर्धन (विजय गिरी) राज्य शासनसाच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आपल्या विविध मागण्यांसाठी व हक्कासाठी एस.टी.महांमडळाच्या कर्मचाÚयांनी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर संपाचे हत्यार उपासले आहे.श्रीवर्धन आगारातील कर्मचारी संपात उतरल्याने संप 100 टक्के यशस्वी झाल्याचे दिसुन येत आहे.संपामुळे दोन दिवसात श्रीवर्धन आगाराचे अंदाजे 9 लाख रुपये उत्पन्न बुडाले असुन देन दिवाळी सणासाठी आपल्या मुळ गावी येणाÚया तसेच संपाअगोदर मुळ गावी आलेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत.चाकरमानी मिळमेल त्या खाजगी वाहनांनी दामदुप्पट पैसा मोजुन प्रवास करीत आहेत. महाराष्ट्र एस टी कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एस टी कामगार संघटना, महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस ( इंटक) कनिष्ठ वेतन श्रेणी संघटना व संघर्ष ग्रृ प यांचा कृती समितीने बेमुदत संपाची हाक दिलेली आहे.कामगार वर्गाने संपास 100% पाठिंबा दिलेले निदर्शनास येते दिनांक 16/10/2017 च्या मध्यरात्री 12 :वा. कामगारांनी संपात सहभाग घेण्यास सुरुवात केली श्रीवर्धन आगारातील 350 कर्मचारी आहेत. एस टी चा कना मानलेला चालक वाहक व यांत्रिक या घटकांनी संपास उस्फुर्त पणे प्रतिसाद दिलेला आहे एस टी आपला संघटना वाद बाजूला ठेवत कामगार एकजूट निदर्शनास आणून दिली आहे कृती समितीच्या प्रलंबित मागण्या
1) एस टी कामगारांचे वेतन शासकीय कर्मचारी प्रमाणे होण्यासाठी सेवा जेष्ठ ते नुसार पदनिहाय वेतनश्रेणी सह सातवा वेतन आयोग लागू करणे
2) कनिष्ट वेतनश्रेणी रद्द करणे व सन 2000 पासून कनिष्ट कामगाराच्या वेतनात विसंगती दूर करणे
3)1 जुलै पासून हंगामी वाढ लागू करणे
4)सेवानिवृत्त कर्मचारी व त्याचा पती पत्नीस रु 500 मानून वर्षभर मोफत पास मिळावा
5)अन्यायकारक परिपत्रके , खाजगी गाड्या भाडयाने घेण्याचा निर्णय चालक काम वाहकची संकल्पना रद्द करावी
6) विविध नियमांना डावलून आकसपूर्वक केलेल्या बदल्या व कारवाया थांबवणे
7)1 जुलै2016 पासून थकीत भत्ते मिळणे बाबत.
आशा विविध मागणीसाठी एस टी कर्मचारी एकजुटीने संपत सामील झालेले आहेत त्या कारणे श्रीवर्धन तालुक्यातील वाहतूक सेवा पूर्ण पणे कोलमडून गेलेली आहे एस टी ला ग्रामीण भागाचा रक्त वाहिनी म्हटले जाते परंतु प्रशासकीय अनस्था कामगार संघटनांची हेकेखोर भूमिका यामुळे दिवाळीचा सणासुदीला एस टी कामगारांनी केलेला संप सर्वसामान्य साठी मानसिक व आर्थिक दृष्टया त्रासदायक ठरत आहे शाळा विद्यालयाना सुट्टी असली तरी सुद्धा शिकवणी वर्गासाठी येणाऱ्या दहावी बारावी व पदवी च्या विद्यार्थ्यांना मोठ्या स्वरूपात त्रास होत आहे सरकारी कर्मचारी शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर गावी जाण्याचा तयारीत असलेल्या अनेक लोकांनी केलेले आगाऊ आरक्षण रद्द करावे लागले सदर संपाला मान्यताप्राप्त एस ती संघटना विरुद्ध प्रशासन अशी किनार अडल्याची निदर्शनास येते सेने चे सरकार राज्यात आल्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेले निर्णय पचनी पडलेले नाहीत त्यातून संघटना विरुद्ध परिवहन मंत्री असा कलगीतुरा सुरू झालेला आहे.प्रशासन विरुद्ध कर्मचारी यांच्या संघर्षाची सर्वसामान्य जनतेस झळ बसत आहे.
दोन महिन्यांपूर्वी श्रीवर्धन आगरातील 105 कर्मचाऱ्यानी परिवहन मंत्र्यांकडे कमी पगाराचे कारण देत ऐच्छिक मरणाचे पत्र दिले होते त्या कारणे राज्य व्यापी संपात श्रीवर्धन आगाराची भूमिका महत्वाची ठरणार असे दिसते.
Post a Comment