म्हसळा - म्हसळा तालुक्यातील केंद्र नेवरूळ मधील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानवे लोकसहभागातून झाली डिजिटल या डिजिटल शाळेचे उद्घाटन म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय साळुंखे साहेब यांच्या शुभहस्ते दिनांक २१ अॉक्टोंबर २०१७ रोजी पार पडले या कार्यक्रमासाठी उपस्थित नेवरूळ केंद्राचे केंद्र प्रमुख पवार सर केंद्र समन्वयक सलाम कौचाली मुख्याध्यापक संतोष खैरे सर मणिलाल वसावे सर ग्रामीण अध्यक्ष देवजी चव्हाण, मुंबई अध्यक्ष मधुकर कासरूंग, धोंडीराम तांबे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धामणे महिला अध्यक्षा शालिनी चाचले, रत्ना तांबे, माजी पोलीस पाटील महादेव काप . आज म्हसळा तालुका प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे याचे सर्व श्रेय आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांचे आहे आणि या उपक्रमासाठी जी जोड आजच्या काळात खूप गरज आहे ती म्हणजे कॉम्प्युटर प्रोजेक्टर ची आणि हि सर्व साधन सामग्री आपण सर्वांनी लोकवर्गणीतून मुंबई करांनी मोठी मेहनत घेऊन केल्याने शिक्षणअधिकारी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. उद्याच्या आदर्श पिढीला आपण शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जे सढल हाताने सहकार्य केल्याबद्दल पानवे ग्रामस्थ यांना केंद प्रमुख पवार सरांनी धन्यवाद दिले तसेच नेवरूळ केंद्रातील एकुण पाच शाळा डिजिटल झाल्या असे घोषित केले. कौचाली सर यांनी मनोगत व्यक्त केले . पोलीस पाटील यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उपस्थित अमित निगुडकर सर, बेटकर सर, कौचाली जनाब मुंबई मंडळाचे, खजिनदार दिनेश शिगवण माजी अध्यक्ष दिलीप शिगवण, नवतरूण मंडळ अध्यक्ष रामचंद्र पिचुर्ले, उपाध्यक्ष राजेश शिगवण, उपसचिव परेश कासरूंग, विनोद शिगवण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धामणे सर यांनी केले. ग्रामस्थ मंडळ ग्रामीण व मुंबई नवतरूण मंडळ, पंचवटी महिला मंडळ, क्रिकेट संघ गावातील जातीने उपस्थित होते.
रा जि प शाळा पानवे लोकवर्गणीतून झाली डिजिटल- गटशिक्षणाधिकारी, साळुंखे
Admin Team
0
Post a Comment