श्रीवर्धनची जनताच माझी लक्ष्मी - आ. सुनील तटकरे


श्रीवर्धन (विजय गिरी ): श्रीवर्धनची जनता हीच माझी लक्ष्मी आहे. म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी श्रीवर्धनला आलोय असे वक्तव्य आ. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे केले. श्रीवर्धन मधील ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादीला भरभरून मिळालेल्या यशाच्या शिल्पकारांचे सरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांचा कौतुक सोहळा येथील शासकीय विश्राम गृहात संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी युवा नेते अनिकेत तटकरे, महंमद मेमन, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, नगराध्यक्ष नरेंद्र भुसाने, उपाध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा परिषद सदस्य प्रगती अदावडे, पं सदस्य मंगेश कोमनाक, वसंत यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
          ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून पक्षाला भरभरून यश मिळालं त्याबद्दल आघाडीच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच अभिमान असल्याचं वक्तव्य आ. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना श्रीवर्धन मध्ये शिवसेनेच्या जातीयवादी संघटनेला दूर ठेवत राष्ट्रवादी सारख्या धर्म निरपेक्ष विचाराच्या पक्षाला स्वीकारल आणि राष्ट्रवादीने श्रीवर्धनमध्ये भव्य दिव्य यश मिळालं ९५ टक्के यश राष्ट्रवादीला मिळालं असताना सामना मध्ये खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  
 साडे तीन वर्षात सत्तेत असलेल्या केंद्रीय मंत्री यांनी दख्तत घेतलेल्या गावात इतके दिवे कि त्यांना नागरिकांनी घरी बसवले असे म्हणत केंद्रीय मंत्री खा. अनंत गीते यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी अछे दिन आणनाऱ्यानी जनतेला वेठीस धरले असून आता
 लौटादो वो बिते हुए दिन वो हि आछे थे आस बोलायची वेळ आणली आहे.  माणसाला महागाईला तोंड द्यावा लागत आहे. १५ लाख काळ धन आणणार असल्याच सांगून नागरिकांची फसवणूक केली १५ फुटकी कावडी सुद्धा कोणाच्या खात्यात जमा झाले नाहीत. असे म्हणत भाजप शिवसेना सरकारवर टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा