त्याच्या उजव्या पायावर गेल्या महिन्यात भली मोठी जखम झाल्याने जायबंदी झाला होता. शिवरामच्या जीवन मानाचा 22 वर्षांचा इतिहास उलघडुन पाहिला तर प्रत्येकजण तोंडात बोटे घातल्या खेरीज राहू शकणार नाही.देव तारी त्याला कोण मारी ही आख्यायिका शिवराम बाबत घडली आहे पण अनंत संकटे झेलत असे जगण माणसाला विचार करायला लावणारेच म्हणावे लागेल.सदृढ माणुस येवढे वर्षे विना निवारा असे जीवन जगु शकेल का हा प्रश्नच गौण आहे मात्र शिवराम याला अपवाद म्हणावे लागेल त्या बाबत केलेले थोडक्यात वृत्तांकन--------
1995 साली नागोठणे येथे अतिवृष्टीने महापुर येऊन तेथील जांभुलपाडा गाव पुराने भक्षण केला होता सुदैवाने दैवबलवत्तर म्हणुन झालेल्या पुरात काही ग्रामस्थ व घरे वाचली होती.महा भयंकर प्रलयकारी पुरात किती संसार उध्दवस्त झाले,किती जीव पाण्याचे प्रवाहात वाहत गेली याचा आकडा ऐकला तर आजही प्रत्यक्ष दर्शनी ज्यांनी तो थरार अनुभवला असेल त्यांच्या सांगण्या वरून अंगावर काटा उभा होतो.तेव्हा तो जरी दैवी संकट मानला गेला तरी ज्यांच कुटुंबच डोळ्यादेखत वाहत गेले त्यांची अवस्था ती काय असु शकते त्यामधील एक जीवंत अनुभव आजही म्हसळयात हयात आहे असा कयास म्हसळे करांचे दृष्टी समोर आहे तो म्हणजे कायमस्वरूपी अबोल असलेला वेडसर पुरुष टोपणनावाने ओळख असलेला शिवराम.जांभुलपाडा वाहुन गेल्या नंतर काही दिवसाने
म्हसळा शहरात पुर्णतः गतिमंद असलेला अंदाजे 40 ते 45 वर्षाच्या इसमाला नाव गाव कोणाला माहीत नाही शहरात भटकत असे,कोण काही देईल ते आणि उकिरड्यावर पडलेले मिळेल ते हा माणुस अन्न भक्षण करीत केवळ जिवंत राहण्याची इर्षा बाळगुन जगत होता.सदरच्या इसमाला काहीच बोलता येत नसल्यामुळे गतिमंद इसम कोण,कोणत्या गावचा,नाव काय असेल आणि म्हसळयात याला कोणी व कसे आणुन सोडले हे माहीत नाही पण शिवराम गेली 22 वर्षे कायमस्वरूपी म्हसळा वाशीय झाला.जांभुलपाडयात शिवराम याचा संपुर्ण कुटुंब वाहुन गेला असावा असे म्हसळे कर नेहमी चर्चा करताना दिसतात.काही वर्षा पुर्वी त्याचे नातलग त्याच्या शोधात आले होते असेही बोलले जाते,तो शिक्षकी पेशातील होता असेही ऐकिवात आहे.शिवराम याचा परिवार डोळ्यादेखत वाहुन गेल्याने त्याचे बुद्धिमत्तेवर विपरीत परिणाम होऊन तो पुर्णतःअबोल आणि गतिमंद झाला असावा असाही अंदाज येथील लोक चर्चा करताना दिसतात.त्या वेळी त्याचे नातलगांनी तो कोणालाही ओळखत नाही आणि त्याची वेडसर अवस्था पाहुन कोणालाही काही न सांगता निघुन गेले असावेत ते आजता गायत पुन्हा माघे वळून पाहिले नाही असाही अंदाज आहे.असे असले तरी म्हसळयातील नागरिक, दुकानदार आणि गरिबांना अन्नदान करणारे नागरिक "शिवरामचे" पालनकर्ते ठरले. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण खऱ्या अर्थाने शिवराम याला तंतोतंत जुळते.गेली 22 वर्षे खास निवारा नाहीच,पांघरूण नाही,अंगावरील अर्धनग्न कपड्या खेरीज कोणताही ऐवज नाही असे असताना एक जवळ गोणपाट खांद्यावर घेऊन उन्हाळ्यात भर उन्हात,पावसाळ्यात चार महिने भिजत आणि थंडीत उबदार कपडे न घालता उगडबंब फिरणं आणि उकिरड्यावर पडलेलं मिळेल ते आणि जे कोण देईल ते खाऊन जगत रहाणे हा एवढ्या वर्षांचा त्याचा नित्यक्रम होता.हॉटेल वाल्यांंकडे चहा,टपरीवर आणि कोणी पायस्थ सिगारेट बीडी पीत असेल तर हाताचा इशारा करून बीडी, सिगारेट मागणे हिच काही ती जगण्याची उर्मी घेत तो नेहमी सर्वांना जगताना दिसत आहे.शिवराम वेडसर असला तरी त्याचे जीवनमान ख्याती म्हसळाचे इतिहासात नोंद झाली आहे.त्याने 22 वर्षात लहान मुलांना,महिलांना किंवा तालुक्यातील नागरिकांना कोणताही कसल्या प्रकारचा त्रास दिला नाही किंवा वाईट हेतूने कोणतेच कृत्य केले नाही.भल्या मोठया गोणपाटात कायनुबायनू भरून ठेवणं हाच त्याचा संसार.10 वर्षापूर्वी तो सर्दीतापाने आजारी पडला होता त्या वेळी म्हसळा शहरातील रिक्षा चालक मालक व समाजसेवी नागरिकांनी त्याचेवर उपचार करून जीवदान दिला होता तद्नंतर शिवराम कधी आजारी पडलेला कोणी पाहिला नव्हता,पाच-सहा वर्षा पुर्वी त्याच्या उजव्या पायास काहीतरी टोकदार वस्तू टोचल्याने तो जायबंदी झालेला होता त्याही परिस्थितीत येथील दानशूर दुकानदार व नागरिकांनी त्याला अन्नदान व औषध पाणी देऊन बर केल होत नंतर त्याचेवर कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक बाळंट आल नाही पुन्हा त्याच जोमाने शिवराम केवळ आणि केवळ जगत होता.त्याचे जीवन काय असेल हे फक्त आणि फक्त ईश्वरा पलीकडे कोणालाही सांगता येणार नाही.बाहेरील कोणत्याच वातावरणाचा किंवा खाण्यापिण्याचा त्याचे शरीरावर वाईट परिणाम होत नव्हता हे नक्की परंतु त्याचे उजव्या पायावर पाच वर्षा पुर्वी झालेली जखम कालांतराने पुन्हा त्याच जागेवर काहीतरी टोचल्याने बळावली असावी आणि याच दुखण्यात शिवराम हतबल ठरला त्याचा उजवा पाय हळूहळू जंतुसंसर्ग झाल्याने खराब झाला आणि त्याची जगण्याची धावपळ आता मंदावली आहे असे असले ज्याचा कोण नाही त्याचा पोशिंदा ईश्वररुपी मानव आहे.शिवरामची हालचाल आणि त्याच्या वेदना पाहता म्हसळयातील समाजसेवकांच्या काळजाला दयेचा पाजर फुटला आणि त्याला जीवदान देण्यासाठी अनेक हात पुढे आले. त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग येथे दखलही करण्यात आलं होतं.
पण आज अलिबाग मध्ये त्याच निधन झालं असून, अंत्यसंस्कार म्हसल्यात होणार आहेत
Post a Comment