( फोटो साभार आपला श्रीवर्धन fb पेज )
दिवेआगर येथे सहा तरुणांना वाचवले
सात दिवसांच्या गणपती विसर्जन करतानाची घटना
बोर्लीपंचतन ( गणेश प्रभाळे ) - श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सहा तरुणांना दिवेआगर येथील समुद्र किनारी गणपती विसर्जन करताना वाचवण्यात आले.
ता. 31 रोजी दिवेआगर समुद्र किनारी सात दिवसाचे गणरायचे विसर्जन होत असताना घडली घटना. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अपघात ठिकाणी नदीच्या पाण्याचा वेगवान प्रवाह व समूद्राच्या पाणी मिळाल्याने मोठा भोवरा तयार झाला आहे. त्याठिकाणी मोठा खड्डा असल्याने पोहणाऱ्यांना अंदाज येत नाही. दिवेआगर येथील समुद्रात ओहोटी ची वेळ , पाण्याचा अंदाज नसताना व समुद्रात काही अज्ञात ठिकाणी खोल खड्डे आहेत. त्यामुळे या तरुणाना स्वतः बचाव करता आलं नाही.
बोर्लीपंचतन येथील संदेश म्हसकर, दिनेश म्हसकर, यशवंत गायकर,ओमकार गायकर,केशव गायकर, विनोद धनावडे, गजानन गायकर या तरुणांचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक कोळी बांधव व पोलीस पुढे आले. बोर्ली येथील समीर पाटील यांनी प्रसंगावधान ओळखून सर्वाना धीर दिला. वेळीच दिवेआगर येथील धाडसी कोळी बांधव मनोहर गोपाळ रघुवीर व लाया लखमा चोगले यांनी पाण्यात जाऊन सर्वांना साखळी पद्धत करुण बाहेर काढले .गणपती विसर्जन दरम्यान बंदोबस्तात असलेलले दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक डी टी सोनके यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या पोलिस वाहनातून या तरुणांना प्राथमिक उपचारासाठी बोर्ली येथील खाजगी रुग्णालयात हलावण्यत आले. आता सर्वांची प्रकृति सुधारलेली आहे.

Post a Comment