सणांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्याची शांतता समितीची बैठक संपन्न...

सणांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्याची शांतता समितीची बैठक संपन्न , सभेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध
म्हसळा : सुशील यादव

येणाऱ्या कालावधीत येणाऱ्या गोपाळकाला, गणेशोत्सव, बकरी ईद, जैन बांधवांचा पर्युषण पर्व समाप्ती या सणांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्याची शांतता समितीची बैठक आज  ( दि. ८ ऑग . ) तहसील कार्यालय म्हसळा येथे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकी साठी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, नायब तहसीलदार टी. एन. भिंगारे, महावितरण चे उप अभियंता यादव इंगळे, म्हसळा एस.टी. बस स्थानक व्यवस्थापक वासकर, आरोग्य विभागाचे महेश पाटील, नगरपंचायतचे अशोक सुतार आदी अधिकारी उपस्थित होते परंतु तहसील कार्यालयाने निमंत्रण देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यामुळे उपस्थितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा बैठकीतच जाहीर निषेध केला. या बैठकी मध्ये या विविध सणांविषयी सखोल चर्चा झाली. गोपाळकाला उत्सव, गणेशोत्सव, बकरी ईद हे सण उत्साहात साजरे करावेत परंतु यादरम्यान म्हसळा तालुक्याच्या शांततेला कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी प्रत्येक समाजातील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रामदास झळके यांनी उपस्थितांना केले. या बैठकी मध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी विसर्जन स्थळी स्वच्छता करणे, विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्याची सुचना स्थानिक नगरपंचायतीला करण्यात आली. तर सणांच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये याची सर्वोतोपरी काळजी घेण्याची सुचना महावितरणला करण्यात आली. तसेच गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे हे लवकरात लवकर भरावे अशी सुचना पुढे आली जेणेकरून खड्यात गणेश विसर्जनाची गाडी आदळून गणेश मूर्तीची विटंबना होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. या बैठकीसाठी हिदू समाज अध्यक्ष सुभाष करडे, महादेव पाटील, बाबाजान पठान, नंदकुमार गोविलकर, श्रीपत धोकटे,आली कौचाली, नाझींम हसवारे, दिलीप कांबळे, अस्लम चील्मायी, अशोक काते, सुरेश जैन, कांतीलाल जैन, यतीन करडे, अनिकेत पानसरे, राजू लाड, योगेश करडे, सरोज म्हशीलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा