श्रीवर्धन शहरातील महिलांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा...

श्रीवर्धन शहरातील महिलांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा... चोरांचा तपास लवकरात लवकर लावुन भयमुक्त वातावरण करण्याची मागणी...

श्रीवर्धन- विजय गिरी, शहरात   चोऱ्यांचे व घरफोडिचे प्रकार घडले असून यामधील घटनेचा तपास  लावुन चोर पकडण्यात  श्रीवर्धन पोलीसांना अद्यापहि यश आले नसल्याने  नागरिकांत  विशेषतः महिला वर्गात  नाराजीचे व  संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे ,पोलीसांना येत असलेल्या अपयशामुले  महिला वर्ग चांगलाच आक्रमक  झालेला आहे , चोऱ्यांचा तपास लवकरातलवकर   लावून चोरांना जेरबंद करुन  शहरातील वातावरण भय मुक्त करावा  या  मागणीसाठी शहरातील महिलानी एकत्र येवुन  निषेध मुक् मोर्चा आयोजित केला होता ,मोर्चाची  सुरुवात सोमजाई   मंदिरापासून निव्रुत्त तहसीलदार रोहिणी शीरसागर यांच्या नेत्रुत्वाखाली झाली मोर्चा  शिवाजी चौक मार्गे पोलीस ठाण्यात धडकला , पोलीस निरीक्षक  परशुराम कांबळे यांनी निवेदन स्वीकारून  वस्तुस्थ्तिति  सांगुन  तपास योग्य दिशेने चालु असल्याचे सांगितले ,तपासात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने   विलंब होवू शकतो पण पोलीस खात्यावरचा  विश्वास कमी होवू देवू नका असे सांगुन  चॉरान्चा तपास लावणे हे खात्याचे काम आहे व आमची जवाबदारी  आहे ,नागरिकांनी  पोलीसांना सहकार्य करावे अफवान्वर विश्वास ठेवु नये असे शेवटी आवाहन केले ,मोर्चात  प्रत्येक पाखाडितिल  महिला सहभागी झाल्या होत्या ,मोर्चात मुस्लिम महिलाँनी देखील आवर्जुन  सहभाग नोंदवला

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा