डॉ. बापुजी साळुंखे यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार ग्रामीण भागात केल्यामुळे आज प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळू लागले आहे : सुभाष करडे

           ( छाया : सुशील यादव )

डॉ. बापुजी साळुंखे यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार ग्रामीण भागात केल्यामुळे आज प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळू लागले आहे : सुभाष करडे
म्हसळा : सुशील यादव
शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या संस्कार केंद्रातून विविध विद्यार्थी आज नावारुपाला येऊ लागले आहेत. शिक्षणाचा प्रसार व प्रचार बापुजींनी ग्रामीण भागात केल्यामुळे आज प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळू लागले आहे. असे प्रतिपादन म्हसळा तालुका हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष सुभाष(बाळ)करडे यांनी म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डॉ. बापुजी साळुंखे यांच्या ३० व्या स्मृतिदिन कार्यक्रमा प्रसंगी केले. यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान करडे यांच्याकडे होते तर शिक्षक-पालक समितीचे उपाध्यक्ष दिलीप कांबळे , नितीन बोरकर , प्रिती दातार , म्हात्रे हे व्यासपीठावर उपस्थित होते. दिलीप कांबळे यांनी विद्यालयाच्या प्रगतीची प्रशंसा केली. ते म्हणाले की या संस्थेचा मी माजी विद्यार्थी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या प्रसंगी चंद्रकांत गाजरे, चंद्रकांत जाधव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. साबा शहा,  अर्चना म्हात्रे, श्रेया पाटील, वंदना चव्हाण , धनश्री मेंदाडकर, रोहिणी धीमर, श्रुती लाड, करन पाडावे, या विद्यार्थ्यांनी सुद्धा बापूजींच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख मंगेश कदम यांनी केले. तर एस.पी. पोतदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक आर.के. पाटील . प्रा. एन. के. बामने, पर्यवेक्षक महामुणकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.     

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा