म्हसळा
नगरपंचायतच्या रस्ता हस्तांतरीत ठरावाला गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचा
तिव्र विरोध, प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा, अवैध मद्यविक्री विरोधात
दिले निवेदन
म्हसळा नगरपंचायतच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये शहरातून
जाणारा राज्य मार्ग हा नगरपंचायत कडे हस्तांतरीत करून घेण्यासंदर्भातील
मुद्दा अग्रगण्य होता . या अनुषंगाने राज्यातील सेवाभावी संघटना "गर्जा
महाराष्ट्र प्रतिष्ठान" च्या वतीने जर राज्य मार्ग म्हसळा नगरपंचायत ने
स्वतःकडे हस्तांतरीत करवून घेतला व त्यामुळे बंद झालेली दारूची दुकाने
उघडली तर म्हसळा शहरामध्ये तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा कडक इशारा
नगरपंचायत प्रशासनाला आज ( दि. २२ ऑग . )दिला . सोबतच म्हसळा शहरात
दारूबंदीनंतर सुरु असलेल्या अवैध मद्यविक्रीवर देखील कठोर कारवाई करून हा
काळा धंदा म्हसळा शहरातून समुळ नष्ट करावा अशा प्रकारचे निवेदन म्हसळा
तालूक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांना "गर्जा
महाराष्ट्र प्रतिष्ठान" कडून देण्यात आले. या संदर्भात प्रतिष्ठानचे
संस्थापक अध्यक्ष सचिन करडे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की , 'मा .
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राष्ट्रीय महामार्ग , राज्य
मार्गापासून ५०o मीटर अंतरामधील मद्य विक्रीवर १ एप्रील १७ पासून बंदी आली
आहे त्यानूसार म्हसळा शहरातील परमिट रूम , बियर शॉपी , देशी बार अशी एकूण
आठ दारूची दुकाने बंद अवस्थेत आहेत . जर नगरपंचायत ने शहरातून जाणारा
राज्य मार्ग ताब्यात घेतला तर ही दारूची दुकाने , बीयर बार पुन्हा सुरू
होण्याचा मार्ग सुकर होणार आहे . तसेच हि दारूची दुकाने बंद झाल्यापासून
म्हसळा शहरातील काही ठिकाणातील गल्लो गल्ली अवैध मद्य विक्रेत्यांचा अगदी
सुळसुळाट झाला आहे . गल्ली गल्लीत , पानगादी , दुकानांवर दारू सहजपणे
उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातील गडगंज नफा पाहून काही सुशिक्षित
बेरोजगार तरुणांनी देखील अवैध दारू विक्रीचा मार्ग अवलंबीला आहे . परंतू हे
अवैध दारू विक्रेते आज काल अजून मोठ्या प्रमाणावर नफा कमविण्यासाठी बनावट
दारू सुद्धा विकत आहेत. जर या बनावट दारुतून पिणाऱ्यास विषबाधा झाली तर
भयानक दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांकडून प्रेरणा घेऊन स्थापन केलेले आमचे गर्जा महाराष्ट्र
प्रतिष्ठान अवैधच काय पण सरकारमान्य मद्यविक्रीला सुद्धा तीव्र विरोध करीत
आहे . असे सचिन करडे यांनी प्रशासनाला कडक शब्दात ठणकावले . या सर्व
प्रकाराची योग्य ती दखल घेणार असल्याचे आश्वासन तहसिलदार रामदास झळके यांनी
सांगितले. याप्रसंगी सचिन करडे यांच्या समवेत बाबू बनकर , कौस्तूभ करडे ,
अक्षय करडे व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते .


Post a Comment