म्हसळा तालुका नाभिक समाजाने मोठ्या उत्साहात साजरी केली संत सेना महाराज पुण्यतिथी...




 म्हसळा : सुशील यादव 
महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे अनेक संतानी भक्ती मार्गातुन समाज परंपरेला जगण्याचा आगळा वेगळा मार्ग दिला आहे. नाभिक समाजाला आदर्शवत असलेले संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा म्हसळा नाभिक समाजाचे वतीने आदर्श शिक्षक मंगेश कदम यांचे निवासस्थानी ग्रंथ वाचन,संत सेना महराज प्रतीमा पुजन,पुजापाठ,प्रमुख पाहुणे सत्कार, ज्येष्ठ नागरिक सत्कार, विध्यार्थी गुणगौरव आणि महाप्रसाद आदि कार्यक्रमांचे आयोजनाने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. प्रथम संत सेना महाराज पोथी वाचन घनश्याम कदम , दिपल शिर्के , वैभव जाधव, नथुराम पवार यांनी केले तर पोथीतील कथीत अर्थ विलास यादव यांनी सांगितला . 
 

 आयोजीत कार्यक्रमाला सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा कविता बोरकर, हिंदु समाज अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेट करडे,कुणाबी समाज नेते श्रीपत धोकटे,हिंदु समाज उपाध्यक्ष नंदकुमार गोविलकर,दैवज्ञ समाज अध्यक्ष सुनिल उमरोटकर,गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन करडे,न्यु इंग्लिश स्कुल प्राचार्य माळी सर, ज्येष्ठ पत्रकार उदय कळस, शिवसेना उपतालुका प्रमुख अनंत कांबळे, समाजसेवक संतोष सावंत,मधुकर पाटील,रायगड जिल्हा नाभिक समाज विभागीय अध्यक्ष दिलीप शिर्के,तालुका अध्यक्ष प्रदीप कदम,उपाध्यक्ष सुनिल भोसले,सचिव दिपल शिर्के, खजिनदार संतोष कदम, ज्येष्ठ सल्लागार विलास यादव सर,महादेव कदम,राजेंद्र बडे,संघटना अध्यक्ष महेश खराडे, संदीप जाधव,महिला मंडळ अध्यक्षा वर्षा यादव,उपाध्यक्षा मेघना कदम,खजिनदार स्मिता जाधव, ज्येष्ठ सल्लागार नथुराम पवार,कृष्णा खराडे,अशोक कदम आदि मान्यवर व महिला मंडळी उपस्थित होते.नाभिक समाजाचे वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला शुभेच्छा देताना हिंदु समाज अध्यक्ष सुभाष करडे यांनी म्हसळा तालुक्यात नाभिक समाज संख्येने जरी छोटा असला तरी संघटीत पणे समाजाचे भावी पिढीला संतमहंतांचे आदर्शवत योगदान माहीत करून देत सामाजिक वारसा जतन करण्याचे चांगले उपक्रम राबवित असल्याचे कौतुक केले व सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या. गर्जा महाराष्ट्र  प्रतिष्ठानचे  अध्यक्ष सचिन करडे यांनी संत सेना महाराज पुण्यतिथी दिनाचे महत्व विषद करताना आज श्रावण शुध्द द्वादशी आणि याच दिवशी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहुन सुटका झाली.प्रत्येकाने पुजा,धर्म आणि समाजाचे हित जोपासलेच पाहिजेत आपल्या महाराष्ट्रात अनेक संतांचे योगदान मोठे आहे त्या मध्ये संत सेना महाराज यांचे कार्य खुपच मौलिक आहे व संत सेना महाराजांबद्दल इतिहासातील महत्वपूर्ण माहीती कथीत केली व संतांचे पुण्यतिथी कार्यक्रम सातत्याने केले पाहिजेत ते समाजहिताचे काम असल्याचे सचिन करडे यांनी सांगितले. कार्यक्रमाला सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा कविता बोरकर,प्राचार्य माळीसर यांनी नाभिक समाजाचे सामाजीक उपक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सुशील यादव यांनी  केले तर आभार तालुका अध्यक्ष प्रदीप कदम यांनी मानले.

 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा