दि. २४ ते २५ जुलै रोजी म्हसळ्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्डयाविरोधात माजी. सभापती श्री. महादेव राव पाटील यांनी उपोषण केले होते. म्हसळा रस्तावरील खड्डे तत्काळ भरले जातील असे लेखी आश्वासन हि प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र म्हसळा शहरालगत असलेले खड्डे भरले गेले मात्र पुन्हा ओवर लोड गाड्या जाऊन बाजूला दुसरे खड्डे पडल्याने परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
रस्त्यावरील खड्डे शासनाच्या पुन्हा निदर्शनास आणून देत, माजी. सभापती श्री. महादेव राव पाटील यांनी तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment