महाराष्ट्र अं.नि.स. जिल्हा रायगड चे म्हसळा येथे कार्यकर्ता संवाद शिबीर संपन्न.


        
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करू इच्छिणाऱ्या किंवा हे काम समजून घेवू इच्छिणाऱ्यांसाठी मअंनिस जिल्हा रायगडने म्हसळा शाखेच्या सहकार्याने रविवार दि.१३ ऑगस्ट रोजी जि.प. कन्या शाळा म्हसळा येथे संवाद शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्‌घाटन जिल्हा अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी केले. महेंद्र नाईक यांनी महा. अंनिसची व्यापक वैचारीक भूमिका व  चतु:सुत्री या विषयाची मांडणी केली. तसेच रोहिदास गायकवाड यांनी पॉवर पॉईंटच्या सहाय्याने 'फलज्योतिष शास्त्र आहे काय?' या विषयाचे सादरीकरण केले. मोहन भोईर यांनी चमत्कार प्रयोग सादरीकरण करून उपस्थितांचा सहभाग घेतला. प्रत्येक विषयाच्या सादरीकरणानंतर उपस्थितांच्या शंकांवर चर्चा करण्यात आली.
                  या शिबीराचे सर्व व्यवस्थापन म्हसळा शाखा कार्याध्यक्ष किशोर मोहिते व प्रधान सचिव जयसिंग बेटकर यांनी उत्तमरित्या केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा