अंकुश गाणेकर
श्री सोमजाईमाता क्रीडा मंडळ ट्रस्ट मुंबई खरसई यांच्या वतीने जिजामाता हायस्कुल वरवठणे आगरवाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक तथा माजी सभापती श्री महादेव पाटील, मंडळाचे संस्थापक चंद्रकांत खोत,ऍड मुकेश पाटील,सचिव दिनेश खोत, स्थानिक अध्यक्ष श्री नरेश कातळकर, कार्यकर्ते श्री नितिन पयेर, माजी सरपंच श्री मनोज नाक्ती, नारायण नाक्ती, कोलवट सरपंच श्री राजाराम तीलटकर, मनोहर डिंगणकर, भालचंद्र पयेर, भालचंद्र शितकर, महादेव मांदारे, गणेश गाणेकर, हरिश्चंद्र नाक्ती, वनिता नाक्ती, राजेश्री नाक्ती, काशिनाथ कोकाटे, नारायण पयेर, नागरे सर, कांबळे सर मनोहर पाटील,लक्ष्मण गाणेकर आदी मान्यवर आणि पालक उपस्थित होते यावेळी रायगड जिल्हा परिषद शाळा आगरवाडा येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्या वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडळाचे संस्थापक श्री चंद्रकांत खोत म्हणाले की तालुक्यात आम्ही गेली ४८वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करीत असून या विद्यालयाचे शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करीत असून गेली 17 वर्ष विना अनुदानित तत्वावर चालू आहे तरी सुद्धा इथले विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत हे अभिमानास्पद गोष्ट आहे या शाळेला आणखी सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे आणि यापुढे दरवर्षी या विद्यालयात आमच्या मंडळाचा कार्यक्रम होईल असेही त्यांनी शेवटी सांगितले
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री महादेव पाटील म्हणाले की आम्ही हे विद्यालय विनाअनुदान तत्वावर चालवत असून सुद्धा या शाळेचा शैक्षणिक दर्जा हाचांगला असून येथील शिक्षक हे विद्यार्थी घडवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात श्री सोमजाई माता क्रीडा मंडळाचे कार्य हे संपूर्ण जिल्ह्यात वाखाणण्याजोगे असून शिक्षण क्षेत्रासह कला, क्रीडा सामाजिक क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी आहे या मंडळाच्या सर्व पदाधिकारी। आणि कार्यकर्ते यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यासाठी आले या भागातील अनेक विद्यार्थी हे गरीब आहेत त्यांना आपण जो मदतीचा हात दिला त्याबद्दल पुन्हा मंडळाचे आभार मानतो असे शेवटी म्हणाले या कार्यक्रमाचे प
सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा सावंत हिने केले तर आभार प्रदर्शन श्री कांबळे सर यांनी केले
Post a Comment