प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक आहे...

मुंबईच्या चाकरमान्यांचा प्रामाणिकपणा

मुंबई - बोर्लीपंचतन येथे प्रवासात हरवलेली बॅग मूळ मालकाकडे सुपूर्द

म्हसळा तालुक्यातून श्रीवर्धन तालुक्यात झाले संपर्क; माणसातील माणुसकी झाली जागी ;

बोर्लीपंचतन ( गणेश प्रभाळे) - गणेशोत्सव निमित्ताने गावी आलेल्या गणेश भक्ताच्या हरवलेली बॅग प्रामाणिकपणे परत देण्याची घटना बोर्लीपंचतन येथे घडली.

गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी आपल्या कुटुंबासहीत आपापल्या गावाकडे येत असतात. नोकरीवरून रुमवर आणि रुमवरुन एसटी मध्ये प्रपंचासहीत घरी येणे आणि उतरताना त्या गडबडीत बॅग विसरणे व पुन्हा त्याला हरविलेली बॅग मिळणे हे तसे अवघडच; मात्र प्रवाशांच्या प्रामाणिकपणामुळे मूळ ऐवजासह बॅग परत मिळाली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी ता. 24 रोजी परिवहन विभागाच्या जादा गाड्या कोकणाकडे सोडण्यात आल्या. गावाकडे जाणारी मिळेल ती गाडी पकडून डोंबिवली वरुन निघालेल्या कल्याण-श्रीवर्धन  एस. टी. मध्ये म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावातील सतीश पेरवी यांना मेंदडी येथे उतरल्यानंतर चुकीची बॅग आपल्याकडे आल्याचे निदर्शनास आले. सतीश यांचे भाऊ प्रमोद धर्मेश नाक्ती यांना ही हकीकत सांगितली. दोघांनी अनेकदा कॉल करून कुणाची बॅग आहे का याबाबत चौकशी केली परंतु जादा गाडी असल्याने संबधितांनकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी बॅग उघडून पाहिली असता यामध्ये रोख रक्कम काही मौल्यवान वस्तू असल्याचे दिसले. पत्ता शोधताना पॅनकार्ड सापडले.

पॅनकार्डवर श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन जवळील वांजळे गावातील दुर्वा दिपक वरणकर यांच्या नावाचा उल्लेख सापडल्याने बोर्लीपंचतन येथील निवास गाणेकर यांच्याशी संपर्क साधला. तर गाणेकर यांनी मोहनलाल सोनी विद्यालयातील प्रितम दिवेकर आणि समाजसेवक प्रमोद वरणकर यांच्याशी संपर्क करून योग्य व्यक्तीची खात्री केली.  शेवटी दुर्गा वरणकर यांना संपर्क साधून दुसऱ्या दिवशी काळसुरी येथून बॅग जमा केली. दुर्गा यांनी सर्वांचे आभार मानले. प्रामाणिकपणे ऐवजासह बॅग परत करण्यास मदत करणारे सतीश पेरवी, प्रमोद नाक्ती, निवास गाणेकर, प्रीतम दिवेकर तसेच प्रमोद वरणकर यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा