म्हसळा- सुशील यादव
जैन समाजाचा आठदिवसीय पर्युषण महापर्व कार्यक्रम दी. 18/08/2017 ते
25/08/2017 या कालावधी मध्ये म्हसळा शहर जैन समाजाच्या वतीने विविध
सांस्कृतिक, धार्मिक व अध्यात्मिक असा संपन्न झाला. सदर कार्यक्रम अतिशय
भक्तिमय व आल्हाददायक वातावरणात पार पडला.
पर्युषण महापर्व काळात जैन मंदिराचे मुळ नायक भगवान
श्री सुमतिनाथ व इतर भगवान यांची सुंदर अंगरचना आठही दिवस जैन महिला
मंडळातर्फे करण्यात आली. तसेच भजनाची जबाबदारी राजेश जैन यांनी श्री
शांतीनाथ जैन आदर्श मंडळ म्हसळा यांच्या संगतीने दररोज अतिशय सुरेल व
भक्तिमय वातावरणात पार पाडली.
दि. 25/08/2017 रोजी वार्षिक क्षमापना(मिच्छामिदुक्कडम)
चा कार्यक्रम पार पडला. व दि. 26/08/2017 रोजी अतिशय धर्मोल्हासात वाजत
गाजत श्री भगवान महावीर स्वामींची मिरवणूक काढून सदर आठ दिवसीय पर्युषण
महापर्वाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी म्हसळा जैन समाजाचे
अध्यक्ष सुरेश जैन , उपाध्यक्ष कांतीलाल(भाऊ) जैन, व जैन समाजातील वरिष्ठ
दीपचंद जैन, कांतीलाल जैन, बाबुशेठ जैन, खेमचंद जैन, रणजीत जैन यांच्या
मार्गदर्शनाखाली श्री. शांतीनाथ जैन आदर्श मंडळ , म्हसळा चे कार्यकर्ते
महावीर जैन , हितेश जैन, मुकेश जैन, मनीष जैन, ललित जैन, चेतन क. जैन,
तेजपाल जैन, प्रकाश जैन , चेतन खे. जैन, राहुल जैन, खेतल जैन, कल्पेश जैन,
अनिकेत जैन, विवेक जैन, दिलखुष जैन यांनी मोलाची कामगिरी बजावली.


Post a Comment