गौरीपूजनसाठी सुपांची मागणी वाढली....


गौरीपूजनसाठी सुपांची मागणी वाढली, म्हसळा श्रीवर्धन मधील व्यवसायिकांची लगबग सुरु.
दिघी ( गणेश प्रभाळे )- कोकणात गणेशोत्सव म्हणजे एक वेगळाच आनंद या उत्सवातिल गौरी पूजन करण्यासाठी सुप ओवसणे हि प्रथा-परंपरा  आहे.  भाद्रपद महिन्यात ही सुपे ओवसली जातात.  यंदा गौरीपूजन  ३० ऑगस्ट ला आहे आहे. त्यामुळे काही दिवस हातात असताना ओवसा करण्यासाठी लागणाऱ्या सुप बनवणाऱ्या व्यवसायीकांचि लगबग पाहायला मिळते.
श्रीवर्धन तालुक्यातील  बोर्ली पंचतन , शिस्ते येथे बुरुड समाजातील मंडळी सुपे बनवण्याचा व्यवसाय करतात. गौरीगणपती च्या उतसवात सुपांची मागणी प्रत्येक घरघरातुन असते. लहान मुलीना रोवली व मोठयांना सुप अशी संख्यागनिक मागणी असते. गणपतीउत्सवातिल गौरी पूजन म्हणजे नववधू साठी पर्वनीच !. गौरीपूजन साठी पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते – यास सूप ओवसणे म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात.  ते सूप सासूने सांगितल्याप्रमाणे सासरच्या नातेवाईकांच्या घरी भेट देते. त्यास ‘वाण देणे’ म्हणतात. 
सूप हे मानवाला घरात अत्यावश्यक असते. ते मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत हवे असते. ते वंशवृद्धीचे प्रतीक आहे. ते मंगल समजले जाते. सवाष्णीचे ते वाण आहे. असे सूप ओवसणे, वाण देणे हे शुभ समजले जाते. हे सूप ओवसणे म्हणजे ओवाळणे, पूजा करणे, व्रत घेणे. मूळ ओवसा म्हणजे वसा,  तिला ओवाळून अखंडपणे दान देण्याचे व्रत घेणे तो ओवसा. यातून सौभाग्यवतीने व्रत घेणे, बरोबर ते व्रत दुसर्‍यांना देणे आणि वंशवृद्धी करणे हे सूचन असते. हा ओवसा दरवर्षी असतोच असे नाही.  सुपांचा ओवसा ही संस्कृती आहे. प्रतिकात्मक अशी नवी सूनबाई जेव्हा घरात येते तेव्हा तिचे दर्शन सासरच्या सर्वच नातेवाईकांना होते असे नाही. त्या निमित्ताने नातेवाईकांच्या घरीही जाणे होते. गौरी-गणपतीच्या दिवसात ओवशानिमित्ताने घरात नववधूचे आगमन एक आनंददायक घटना असते. घरात भरले सूप येणे हे लक्ष्मीचे प्रतीक असते.
सध्याच्या धकधकित कितीही दिवस बदलले तरी गणपती उतसवात गौरी पूजन साठी सुपांची मागणी राहतेच. है वैशिष्ट आहे. त्यामुळे काही दिवस काही होइना सुप व्यवसायिकांचा व्यवसाय तेजीत असतो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा