म्हसळा तालुक्यात गावागावत गौराईचे धुमधडाक्यात आगमन....



( फोटो साभार विनायक खोत )

खरसई, म्हसळा./प्रतिनिधी
 गणपती उत्सवात कोकणात विविध समाजाच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात. गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनाने. आज कोकणात ठिकठिकाणी गौरीचे आगमन धुमधडाक्यात वाजतगाजत करण्यात आले. कोकणातील महिला गौराईच  आगमन अनोख्या पद्धतीने करतात. पाणवठ्यावरुन तेलड्याची रोप आणि वर रुईच पान, या पानाला चेहऱ्याचा आकार देऊन सजवल सजवतात. मस्त नटून सजवून गौराईला घरी आणतात. काही गावात गौरीच्या मुखवट्याची गौरी घरी आणण्याची परंपरा आहे.
गौरी आणताना आगमनाची रंगतदार गाणी गुणगुणत आज  घराघरात गौरीचे आगमन करतात.  गौरी आगमनाबरोबर गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधाना करण्याची परंपरा पाहायला मिळते.  अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन होत. सनई आणि ढोल तशा च्या ठेक्यावर पारंपारिक गाणी गुणगुणली जातात. आज गौरीसाठी गोड नैवेद्य केला जातो. तसेच भाजी-भाकरी हि दिमतीला असतेच.
 आज गौराईचे आगमन व रात्रभर गौराईचा जागर केला जाणार जातो. गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाणी म्हटली जातात. गौरीचा मुखवटा धरुन तो पाणवठ्यावरुन घरापर्यंत सुहासिनी घेवून येतात.  घराच्या उंबऱ्यावर आलेल्या गौरीचे धुमधडाक्यात स्वागत होते आणि गौरी आगमनाने गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते. 



( फोटो साभार विनायक खोत )


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा