छाया : सुशील यादव
म्हसळा : सुशील यादव
म्हसळा तालूक्यात मागील दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार
पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर शहरात ठीकठीकाणी पाणी साचण्याच्या
घटना होत आहेत. म्हसळा शहराची रचनाच अशी आहे की शहरात कधीही पुर येऊ शकत
नाही तरीही विकसकांनी सर्व नियम ढाब्यावर बसवुन केलेली अनधिकृत बांधकामे
तसेच नगरपंचायतीने न केलेली नालेसफाई यामुळे माणगाव-दिघी राज्यमार्ग
म्हसळे शहरात महावितरण कार्यालय ते फातीमा मेन्शन पर्यंत पाण्याखाली गेला
आहे.अरुंद गटारांमुळे पावसाच्या तसेच सांडपाण्याचा निचरा रस्तावरुन
झाल्याने या रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे.या रस्त्यालगत म्हसळा
महावितरणाचे कार्यालय तसेच शाळा असुन येथे एक फुटा पेक्षा जास्त पाणी साचले
आहे. म्हसळ्याकडुन दिवेआगर,दिघी कडे जाणारा हा प्रमुख व एकमेव राज्यमार्ग
आहे, हा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या
प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. म्हसळा प्रमुख बाजारपेठ असल्याने शासकीय
कामांसाठी त्याचप्रमाणे खरेदी करण्यासाठी नागरीक येत असतात त्यातच रस्ता
पाण्याखाली गेल्याने ठिकठिकाणी मोठे अपघाती खड्डे पडले असुन बाईकस्वार येथे
पडण्याच्या घटना रोज होत आहेत तरी देखील या रस्त्याच्या दुरवस्थेकडे
कोणीही पाहत नसल्याने नागरीकांत संतापाची लाट उसळलेय. म्हसळे शहरातुन
जाणारा हा राज्यमार्ग दिवेआगर पर्यटन स्थळ तसेच दिघी पोर्टला जाणारा एकमेव
मार्ग असल्याने या मार्गावरुन प्रवासी वाहनांसोबत पर्यटकांची वाहने सतत ये-
जा करीत असतात परंतू दिघी पोर्टकडुन होणारी अवजड वाहतुक प्रामुख्याने
35टन वजनाची लोखंडी कॉईल व कोळसा वाहतूक यामुळे खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ
होऊन माणगाव -दिघी या राज्य मार्गाची दुरावस्था झाली आहे . आणि गेल्या दोन
दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सदर मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे .
Post a Comment