गावाचा विकास हा शिक्षणातूनच साधता येईल हे ओळखून, लोकसहभागातून माणेरी- नानवली शाळा डिजिटल

प्रतिनिधी,
गणेशोत्सवाचे औचित्य साधून लोकसहभागातून रायगड जिल्हा परिषद शाळा माणेरी- नानवली ही शाळा डिजिटल झाली. १ लाख ५२ हजारांचा निधी  लोकसहभागातून उपलब्ध करून रा. जि. प शाळेला डिजिटल करण्यात आले.
श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापती सुप्रिया गोवारी यांच्या हस्ते डिजिटल शाळेचे उद्घाटन झाले. उपक्रमशील शाळा अशी ही शाळेची ओळख तालुक्यात आहे. गावाचा विकास हा शिक्षणातूनच साधता येईल हे ओळखून विध्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागातून आपली शाळा डिजिटल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणासाठी वाचनालयाचे उद्धघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला श्रीवर्धन चे वनक्षेत्रपाल श्री एस. एन. पाटील, राज्यस्तरीय तंत्रस्नेही समीर सय्यद , स्वदेश फौंडेशन चे मयूर वाघ, मुस्तक दळवी, अरुण नागवेकर, जयदास आंबाजी आदी मान्यवर आणि इतर सामाजिक करकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा