पुढील 4 तासात अतिवृष्टीचा इशारा

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून पुढील 4 तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 से.मी ते 12 से.मी) ते त्यापेक्षा अधिक (12 से.मी. ते 24 से.मी.) होण्याची पूर्वसूचना जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे दरडग्रस्त, नदी किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये.
तसेच अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. पुरस्थिती उद्भवल्यास त्यास समोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/222097/222322 या क्रमांकावर द्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा