गणरायाच्या साक्षीने अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनिस म्हसळा कडून प्रबोधन...

म्हसळा  तालुक्यातील संदेरी गावात डी. जे. सार्वजनिक गणेशोस्तव मित्र मंडळातर्फे अनोखा उपक्रम.
महाराष्ट्र  अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा - म्हसळा  यांच्या माध्यमातून दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री
''बुवाबाजी आणि चमत्कार हातचलाखी" या अनिस च्या प्रयोगांचे सादरीकरण केले.
श्री संतोष जाधव आणि प्रा. विनयकुमार यांनी सदर कार्यक्रमात प्रयोगाचे सादरीकरणकरून  करून समाज प्रबोधन केले.
बुवा- बाबा हे लोकांचे अज्ञान व असहायतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करतात. यायबाबत नाकरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पेटता कापूर दोंडात घेणे, जिभेत तार घालणे, जळता तवा हातावरून फिरवणे, अश्या विविध प्रयोगांचे सादरीकरण करून याला वैज्ञानिक जोड कशी आहे हे पटवून दिले..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा