म्हसळा : प्रतिनिधी
रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळाने घेतलेल्या जिल्हा स्तरीय गणित संबोध परीक्षेत स्वामी विवेकानंद संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज , म्हसळा मधील विद्यार्थी अनिकेत शांताराम जाधव याने ९४% गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला व याच परीक्षेत म्हसळा तालुक्यात त्याने प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण होउन आपले व आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. याच विद्यालयातील इयत्ता ५ वी मधील विद्यार्थिनी पायल नरेश सावंत हिने याच परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद चंद्रकांत गांजरे, अंकुश पेठे, नितीन हिरवे , नितीन हंगे व गोसावी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याद्यापक बी.एन. माळी, स्कूल कमिटी चेयरमन समीर बनकर, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, ज्येष्ठ शिक्षक आर.के.पाटील, पर्यवेक्षक महामुणकर, प्रा. बामणे यांनी केले.
Post a Comment