युवानेते अनिकेत तटकरे व जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे उद्या म्हसळा-श्रीवर्धन दौऱ्यावर


राष्ट्रवादी युवक संघटना मजबूत करणार
घुम - श्रीकांत बिरवाडकर

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि रायगड जिल्ह्यच्या जडणघडणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सुनिल तटकरे यांनी राज्याच्या तिजोरीतून विविध खात्यातून निधी आणून प्रत्येक तालुक्यात गावोगावी करोडो रुपयांची विकास कामे करुन जणू विकासाची गंगा जिल्ह्यात आणली आहे. विकासाचे पर्व जिल्ह्यात आणलेे असले तरी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खुद्द सुनिल तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांच्या समोर पराभवाला सामोरे जावे लागले होते या पराभवाची झळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असून त्याची परत फेड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. रायगड जिल्ह्यात आगामी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी व गावोगावी कार्यकर्त्यांची व पक्षाची बांधणी करण्यास सर्वच स्थानिक पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. या मोर्चे बांधणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून आमदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते अनिकेत तटकरे व राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे हे दि. 17 ऑगस्ट पासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्ह्यात आगामी काळात सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक पणे भूमिका मांडणार असल्याने आज दि.18 ऑगस्ट रोजी दुपारी 02:00 वाजता रेस्ट हाऊस म्हसळा येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा  करण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात दौरा करणार असल्याचे म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष नाझीमभाई हसवारे यांनी प्रतिनिधींना सांगितले आहे.
या दौऱ्यात प्रामुख्याने पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन युवकांना अधिकाधिक पक्ष संघटनेत विविध पदांवर कार्यरत करुन युवक संघटना मजबूत करण्यात येणार आहे. या दौऱ्यात अनेक युवकांना जिल्हा व तालुका पातळीवर विविध पदांवर नियुक्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 14 ग्रामपंचयत निवडणूक संदर्भात आढावा घेण्यात येणार असून अनिकेत तटकरे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आगामी धोरण व कार्यपद्धती यावर भूमिका मांडणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा