दिघी ग्रामपंचायतचा टँकर ने पाणीपुरवठा बंद प्रांताधिकारिंच्या बैठकीत निर्णय, मात्र टंचाई झाल्यास पाणी मिळावा...


बोर्लीपंचतन : [ गणेश प्रभाळे ] - रायगड जिल्ह्यातील दिघी येथील समुद्रात दिघी पोर्ट उभे राहिले आहे. येथील नागरिकांना पोर्टकडून नागरी सुविधा मिळाव्यातअशी मागणी स्थानिकांनी केली होती. यासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिघी परिसरातील दिघीकरलासमणेरीनानवली या चार गावांना १०० टँकरने पाणीपुरवठा करावाअसे आदेश उच्च न्यायालयाने दिघी पोर्टला दिले होते.
दिघी पोर्टकडून या आदेशाची अंमलबजावणी होत असताना सद्या पावसाळी परिस्थितीत दिघी परिसरातील गावांना पाणीटंचाई भासत नसल्याने सर्वत्र मुबलक पाणी असल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात यावे असे प्रतिवादी दिघी पोर्ट कडून याचिका दाखल करण्यात आली होती. या फेरतपासनीत उच्चन्यायालय ने जिल्हाधिकारी यांना आदेश देत दिघी परिसरातील पाणीपुरवठा माहितीबाबत श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत दिघी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष ग्रामसभेला प्रांताधिकारी प्रवीण पवारतहसीलदार जयराज सूर्यवंशीसहा. पोलीस निरीक्षक धर्मराज सोनकेसरपंच सुमती चिकाटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी या सभेचे महत्व सांगूनदिघी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या चार गावांना पावसाळ्यात टँकर ने पाणी पुरवठा हवा का याबाबत विचारणा केली यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तसेच समाजप्रतिनिधी यांनी पावसाळ्यात पाण्याची गरज नसल्याचे सांगितले मात्र जेव्हा कधी पाणी टंचाई भासेल त्यावेळी विनंती नुसार दिघी पोर्ट ने तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावात्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असेही ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले.
दिघी ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील दिघी कोळीवाडामुस्लीम समाजबौद्धवाडीमणेरी-नानवलीआदिवासी वाडीभंडारी समाजकरलास-सावर्डेया गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सद्या पाऊस चालू असल्यामुळे गावात पाणीपुरवठा मुबलक आहे. मात्रकोळी समाजाची लोकसंख्या जास्त असून व मच्छीमारिचा व्यवसाय असल्यामुळे पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. पाण्याचा साठा कमी झाल्यास तत्काळ मागणी केल्यास दिघी पोर्ट ली. कंपनीकडून पाणीपुरवठा चालू करण्यात यावा अशी मागणी कोळी समाज अध्यक्ष जनार्दन गोवारी यांनी केली.
दिघी येथील गावांना दिलेल्या आदेशांप्रमाणे पाणी पुरवठा न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलच धारेवर धरलं होते. दिघी प्रकल्पास सुरूवात झालीतेव्हा दिघीसह कलरासमणेरीनानवली या पंचक्रोशीतील चार गावांना दिवसाला 100 टँकर पाणी पुरवण्याची हमी सरकार आणि इतर प्रतिवाद्यांनी दिली होती. मात्रप्रत्यक्षात केवळ 9-10 टँकर पाणी पुरवठा केला जात असल्यानं दिघी कोळी समाज मुंबई यांच्यावतीनं हायकोर्टात जनहित याचिका करण्यात आली होती.

श्री. गणेश गजानन प्रभाळे , 
पत्रकार - बोर्ली पंचतन ,

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा