वरवठण्यात गावठी दारू दुकानांवर धाड, आरोपी पोलिसांच्या ताब्यात..


तालुक्यात देशी व विदेशी दारूची दुकाने बंद झाल्यामुळे चोरट्या गावठी दारूची विक्रीत वाढ झाल्याची चर्चा असताना म्हसळा पोलिसांनी वरवटणे येथे गोपनिय माहीतीच्या आधारे धाड टाकली असता अरविंद यशवंत गमरे रा. बौध्दवाडी वरवटणे याच्या ताब्यातून रू.१७,९७५/- किंमतीची एकूण २१६.७५० ली. गावठी हातभट्टीची दारू साहीत्यासह हस्तगत करण्यात आली. त्यावरून गु. र. नं.३९/२०१७, म. प्रोव्ही. का. क. ६५( ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत, सपोनि. सुदर्शन गायकवाड, पो. हेड काँ./११४६, भोईर, पोना. १२६५ आर्यशील मोहीते, १०२० वैभव पाटील, १२५० अरूण सातपुते, पो. काँ. १३३५ जयेश भोईर हे सहभागी झाले होते. पुढील तपास पोना. १२५० सातपुते हे करीत आहेत.वरवटने येथील कारवाई स्तुत्य असून तालुक्यातील अन्य गावांमध्ये सुद्धा होत असलेल्या गावठी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा