माणगाव तालुक्यापासुन १७ कि.मी. अंतरावर चांदोरे गाव असुन माणगाव ते म्हसळा या महामार्गावर वसलेले आहे.ग्रुप ग्रामपंचायत चांदोरे ग्रामपंचायतीची लोकसंख्या १८१६ असुन गावात एकुण ४२१ कुटुंब आहेत. गावामध्ये सर्व जाती जमातीचे लोक राहत असुन गावामध्ये सामाजिक सलोखा व ऎक्याचे वातावरण आहे. गावामध्ये सर्व अभियाने प्रभाविपणे राबविण्यात आली आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागस्तरापर्यत बक्षिसास पात्र झालेली पंचायऎअ असुन लोकांचा सहभाग समुहशक्तीचा लोकचळवळीचा हा विजय आहे.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना शासनाने सन २०१० पासून सुरु केली. पर्यावरणाचा समतोल व ग्रामविकास या तत्वावर सुरु केलेली ही योजना विकासाची एक मार्गदर्शिका ठरली. ही योजना सुरु होण्या अगोदर चांदोरे गांव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छाता अभियानाऎअ सन २००० २००१ पासूनच सक्रिय सहभाग घेत असल्याने स्वच्छाता बऱ्यापैकी होती. सन २००५ २००६ ला शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. परंतु घनकचऱ्याचे व्यवस्थापन, पाणीव्यवस्थापन, अपारंपारिक उर्जास्त्रोतांचा योग्य वापर, प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर,पिशव्यांपासुन होणारे प्रदुषण हे गावाच्या आरोग्याला व सौदर्याला धोकादायक होते. या योजनेच्या निकषाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने प्रथम,व्दितीय व तृतीय वर्षाऎअ गावाला निधी प्राप्त होत असल्याने लोकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. ग्रामसभेत निर्णय घेऊन सन २०१० २०११ या पहिल्या वर्षाऎअ एक व्यक्ती एक झाड या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला व पहिल्या वर्षात १९२५ झाडे लावली व त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली व पहिल्या वर्षाअखेरीस १६३८ झाडे जगविली.
गावाविषयी सर्वसाधारण माहिती :-
चांदोरे ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत चांदोरे, रानवडे आणि नळेफोडी या गावांचा समावेश होत असुन ग्रामपंचायतीची स्थापना १ एप्रिल १९५८ रोजी झालेली आहे. चांदोरे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असुन गावाची लोकसंख्या २०४८ आहे. गावातील अनुसुचित जाती कुटुंबसंख्या ८० असुन अनुसुचित जमाती कुटुंबसंख्या ११ आणि इतर मागासवर्गीय कुटुंबसंख्या ३३० आहे. चांदोरे गावातील एकुण कुटुंबसंख्या ४२१ असुन गावाचे माणगाव तालुक्यापासुन अंतर १७ कि.मी. आहे. माणगाव ते म्हसळा या महामार्गावर चांदोरे गाव वसलेले आहे. गावाचा पंचायत समिती गट मांजरवणे असुन सौ. सपना सुनिल पिचुर्ले या गटातील पंचायत समिती सदस्य आहेत तसेच गावाचा जिल्हा परिषद गण गोरेगाव असुन या गणातील जि. प. सदस्य सौ. राधिका कृष्णा तटकरे या आहेत. चांदोरे गावातील खाजगी शौचालयांची संख्या ४२१ असुन गाव हगणदारीमुक्त आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची क्षमता २०,००० लिटर आहे. पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत सार्वजनिक विहीर असुन संपुर्ण गावाला नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गावाचे भौगोलिक क्षेत्र :-
चांदोरे गावाचे एकुण भौगोलिक क्षेत्र १४३९ हेक्टर असुन या क्षेत्रापैकी लागवडीयोग्य क्षेत्र ७५९ हेक्टर आहे. गावातील सद्यस्थितीत लागवडीखालील क्षेत्र २२० हेक्टर असुन या क्षेत्रापैकी बागायती क्षेत्र १० हेक्टर असुन १८८ हेक्टर क्षेत्र जिरायत आहे. गावातील खाजगी पडीक जमीन ९६ हेक्टर असुन सरकारी पडीक जमीन ६७ हेक्टर आहे. चांदोरे गावात १५ हेक्टर क्षेत्राखाली वनक्षेत्र असुन गायरान क्षेत्राखाली ५० हेक्टर क्षेत्र आहे. गावठाण, नदी, नाले, रस्ते आणि पाण्याचे पाट या क्षेत्राखाली गावाचे ३० हेक्टर क्षेत्र असुन याव्यतिरिक्त ४ हेक्टर क्षेत्र आहे. चांदोरे गावात पावसाळयात भात, नाचणी आणि वरीच्या पिकांचे उत्पादन सुमारे ११२० हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत असुन वापरण्यात येणार्या जाती/वाणांमध्ये रत्ना, जया, सुवर्णा आणि कर्जत यांचा समावेश होतो. हिवाळयात वालाचे उत्पादन १५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत असुन करवेवाल या जातीच्या बियाण्यांचा प्रामुख्याने वापर करण्यात येतो. उन्हाळयात कलिंगड आणि भाजीपाला या पिकांचे उत्पादन साधारणतः ९४ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत असुन शुगर बेबी या वाणांचा प्रामुख्याने शेतकर्यांकडुन वापर करण्यात येतो. एकवर्षीय आणि बहुवर्षीय पिके/झाडे यामध्ये काजु, आंबा, फणस आणि नारळ या झाडांचा समावेश होत असुन ९४ हेक्टर क्षेत्राखाली हे क्षेत्र आहे. गावात २७५ कुटुंबांमार्फत सेंद्रिय शेती करण्यात येत असुन सेंद्रिय शेतीखालील एकुण क्षेत्र ८७७ हेक्टर आहे. चांदोरे गावात आढळणार्या झाडांमध्ये निव, साग, आंबा, काजु, भेरडा बांबु, हेला, पिंपळ, वड, आपटा आणि इतर वृक्षांचा समावेश होतो.
गावातील वृक्षलागवड :-
चांदोरे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत २०१० ते २०१५ या कालावधीत गावातील घर आणि घरांच्या परिसरात ६३८ झाडांची लागवड ग्रामस्थांमार्फत करण्यात आली असुन सद्यस्थितीत झाडे जिवंत आहेत. चांदोरे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत रस्त्याच्या दुतर्फा २८६२ झाडांची लागवड करण्यात आली असुन झाडे जिवंत आहेत. शासकीय इमारत परिसर ५०० झाडे, गावातील सार्वजनिक जागेवर ९३७ झाडे आणि शेतकर्यांच्या शेत बांधांवर १०१० झाडांची लागवड ग्रामपंचायतमार्फत करण्यात आली असुन सद्यस्थितीत झाडे जिवंत आहेत. जल आणि मृद संधारणाच्या कामांमध्ये गावात ३ सिमेंट नाला बांध बांधण्यात आले असुन २ माती नाला बांध बांधण्यात आले आहेत. गावात २ पाझर तलाव असुन ३ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. गावात मृदसंधारणाअंतर्गत नालाबंडीगचे १ काम झालेले आहे.
गावचा पाणीपुरवठा :-
चांदोरे गावात १ हातपंप असुन १२ कुटुंब या हातपंपाचा वापर पाण्यासाठी करीत आहेत. चांदोरे गावात ५ सार्वजनिक विहीरी असुन या विहीरींद्वारे नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावातील ४२१ कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावात खाजगी नळजोडणी कोणत्याही घरासाठी करण्यात आली नसुन ४ नळपाणी पुरवठा योजनांद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने नियमितपणे घेण्यात येत असुन आतापर्यंत एकदाही नमुने दुषित आलेले नाहीत.
घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन :-
चांदोरे गावात प्रत्येक दिवशी सुमारे ५०० किलो ओला आणि कोरडया स्वरुपातील घनकचरा निर्माण होतो. या घनकचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गावातील २० कुटुंबे हा घनकचरा उकिरडयावर टाकुन या घनकचर्याचे खत झाल्यानंतर शेतीसाठी वापरतात. गावातील ४०१ कुटुंबे दररोज निर्माण होणारा घनकचरा कचराकूंडीत टाकतात आणि ग्रामपंचायतमार्फत या कचर्याची विल्हेवाट लावण्यात येते. गावात दररोज निर्माण होणार्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी गावातील २७५ कुटुंब शोषखड्डयाचा वापर करीत असुन १४६ कुटुंबांनी घराच्या परिसरात परसबागेची निर्मित्ती केली असुन सांडपाणी परसबागेत सोडण्यात येते. चांदोरे गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदिस्त किंवा उघडे कोणत्याही प्रकारच्या गटारांची व्यवस्था नाही.
गावातील शैक्षणिक स्थिती :-
चांदोरे गावात अंगणवाडीमध्ये २४ मुले आणि २६ मुली मिळुन ५० विद्यार्थी असुन अंगणवाडीला स्वतंत्र शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्राथमिक शाळेत १२० मुले आणि ८१ मुली मिळुन २०१ विद्यार्थी शिक्षण घेत असुन प्राथमिक शाळेला मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असुन पिण्याच्या पाण्याची सोय आहे. माध्यमिक शाळेत ५६ मुले आणि ५३ मुली मिळुन १०९ विद्यार्थी शिक्षण घेत असुन माध्यमिक शाळेत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध असुन पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आलेली आहे.
गावातील रस्त्यांची स्थिती :-
चांदोरे गाव माणगाव तालुक्यापासुन १७ कि.मी. अंतरावर असुन माणगाव ते म्हसळा या महामार्गावर वसलेले आहे. गावातील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आलेले असुन पांधण आणि शेतरस्ते कच्चा रस्ता, माती आणि बांध स्वरुपाचे आहेत.
गावातील सोयीसुविधा :-
चांदोरे गावात चांदोरे, रानवडे आणि नळेफोडी या गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय असुन चांदोरे कुणबी माळी आणि चांदोरे बौद्धवाडी असे २ समाजमंदिर आहेत. रानवडे कोंड येथे १ व्यायामशाळा आहे. प्राथमिक शाळा, चांदोरे येथे ग्रंथालय आहे. माणगाव ते म्हसळा या महामार्गावर चांदोरे गावात १ बसस्थानक आहे. गावात ७ सौर पथदिवे बसविण्यात आलेले असुन १७२ पथदिवे आहेत. जिल्हा परिषद शाळेसाठी १ खेळाचे मैदान असुन गावात २ गाव तलाव आहेत. चांदोरे ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत एकुण ५ स्मशानभूमी आहेत.
गावातील लोकजीवन :-
चांदोरे गावात ४२१ कुटुंबसंख्या राहत असुन स्वयंपाकासाठी इंधन म्हणुन गावकर्यांकडुन गॅस, बायोगॅस आणि केरोसिन स्टोव्हचा वापर करण्यात येतो. स्वयंपाकासाठी इंधन म्हणुन ३२ कुटुंबे लाकुडाचा वापर करीत असुन १२७ कुटुंबे केरोसिनचा वापर करीत आहेत. गावातील २५५ कुटुंबांकडे गॅस कनेक्शन असुन गावातील ७ कुटुंबे स्वयंपाकासाठी इंधन म्हणुन बायोगॅसचा वापर करीत आहेत. गावातील सर्वच ४२१ कुटुंबांकडे वीज कनेक्शन असुन गावातील सर्वच ४२१ कुटुंबांमध्ये सीएफएलच्या दिव्यांचा वापर करण्यात येत आहे. गावातील ४०० कुटुंबांकडे टेलिफोन अथवा मोबाईल असुन ३६७ कुटुंबांकडे टी.व्ही. आहेत. गावात १८२ कच्च्या स्वरुपाची घरे असुन २३९ पक्क्या स्वरुपाची घरे आहेत. गावातील दारिंदा्रय रेषेखालील कुटुंबांची संख्या १८६ असुन दारिंदा्रय रेषेवरील कुटुंबांची संख्या २३५ आहे. गावात स्वतःच्या मालकीची शेतजमीन असलेल्या कुटुंबांची संख्या ३३९ असुन १ एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या कुटुंबांची संख्या २३८ आहे. १ ते २.५ एकर शेतजमीन असलेले खातेदार ८३ असुन २.५ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या कुटुंबांची संख्या ६९ आहे. ५ ते १० एकरपर्यंत शेतजमीन असणार्या कुटुंबांची संख्या २५ असुन १० एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणार्या कुटुंबांची संख्या ७ आहे. गावातील २९ कुटुंबांकडे वेगवेगळया प्रकारचे १८७ प्रकारचे पशुधन उपलब्ध आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील ४० कुटुंबांना जॉबकार्ड मिळालेले असुन सध्या कामावर उपस्थित मजुरांची संख्या ३२ आहे. गावातील कुटुंबातील सदस्य खाजगी नोकरीत असलेल्या कुटुंबांची संख्या १०९ असुन कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबांची संख्या ६७ आहे.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना :-
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत चांदोरे ग्रामपंचायतमार्फत ४००० वृक्षांची लागवड करण्यात आली, त्यापैकी २००० वृक्षांची वाढ जोमाने आणि चांगल्या स्थितीत झाली. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत दुसर्या वर्षी २००० वृक्षांची लागवड करण्यात आली असुन सर्वच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे करण्यात आले. पहिल्या आणि दुसर्या वर्षाचे मिळुन चांदोरे गावात असलेल्या वृक्षांची संख्या ४००० इतकी होती. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे तिसर्या वर्षाचे निकष पुर्ण करण्यासाठी २००० वृक्षांची लागवड करण्यात आली असुन सर्वच वृक्षांची काळजी घेऊन संगोपन करण्यात आले. पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या वर्षाचे मिळुन चांदोरे गावात ६००० वृक्षांची लागवड करण्यात आली असुन ही सर्व वृक्ष जिवंत आहेत. या सर्व वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांमार्फत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत वृक्ष लागवडीसंदर्भात वृक्ष लागवड रजिस्टर ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आलेले आहे तसेच वृक्ष लागवड केलेल्या जागांचा हात नकाशाही तयार करण्यात आलेला आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत पहिल्या आणि दुसर्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या सर्वच वृक्षांना क्रमांक देऊन टॅगिंग करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत चांदोरे कार्यालयामार्फत २०१३/१४ या वर्षी क्षेत्रफळावर आधारीत कर आकारणी करण्यात आलेली आहे. क्षेत्रफळावर आधारीत सुधारीत कर आकारणी यापुर्वी २००९/१० या वर्षी करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयामार्फत कर आकारणी रजिस्टर व मागणी रजिस्टर अद्ययावत ठेवण्यात आलेले आहे. चांदोरे ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत ४२१ कुटुंब राहत असुन वैयक्तिक शौचालय असलेल्या कुटुंबांची संख्या ४२१ असुन टक्केवारी १०० आहे. सद्यस्थितीत गावातील ४२१ कुटुंबांतील सर्वच सदस्य शौचालयाचा वापर करीत असुन ग्रामपंचायत कार्यालयात शौचालय रजिस्टरमध्ये सर्व शौचालयधारकांची अद्ययावत नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. चांदोरे ग्रामपंचायत कार्यालयाला २००५/०६ या वर्षी निर्मलग्राम पुरस्कार मिळालेला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर गावात बंदी घालण्यात आली असुन अंमलबजावणी १०० टक्के सुरु आहे. गावातील विविध उत्सवातील मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणदृष्टया अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात २०१४ मध्ये जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मुल्यमापनात चांदोरे ग्रामपंचायतीला ९७.५ गुण (१०० पैकी) मिळालेले आहेत. यशवंत पंचायतराज अभियानात २०१४ मध्ये चांदोरे ग्रामपंचायतीला ९७.५ गुण मिळालेले आहेत. चांदोरे गावात ९७ सीएफएल बल्ब बसविण्यात आलेले असुन १३ सोलर दिवे आणि ५ एलईडी बल्ब बसविण्यात आलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १०० टक्के कचरा संकलन करण्यात येत असुन १०० टक्के कचर्याचे व्यवस्थापन करण्यात येते.
गावाला मिळालेले पुरस्कार :-
१) निर्मल ग्राम पुरस्कार - २००५/०६
२) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान - २००५/०६ - द्वितीय (जिल्हा स्तर)
३) बळवंतराय मेहता पंचायतराज शांतीवन नेरे - २००६/०७ - प्रथम
४) महात्मा गांधी तंटामुक्त अभियान - २००७/०८ (विशेष पुरस्कार)
५) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान - २००९/१० - तृतीय (जिल्हा स्तर)
६) पर्यावरण विकासरत्न पुरस्कार - २०१०/११ ७) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान - २०१०/११ - प्रथम
८) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान - २०११/१२ - प्रथम (कोकण विभाग)
९) यशवंत पंचायतराज अभियान - २०११/१२ - तृतीय (कोकण विभाग)
१०) यशवंत पंचायतराज अभियान (गौरव ग्रामसभा) - २०११/१२ - प्रथम
११) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान - २०१२/१३ - तृतीय (कोकण विभाग)
१२) यशवंत पंचायतराज अभियान - २०१३/१४ - प्रथम (कोकण विभाग)
१३) यशवंत पंचायतराज अभियान - २०१३/१४ - तृतीय (राज्यस्तर)
१४) राजीव गांधी पंचायतराज सशक्तीकरण अभियान - २०१३/१४ - केंद्र स्तर (संयुक्त)
साभार - ग्रुप ग्रामपंचायत चांदोरे, चांदोरे गावातील मित्र परिवार




Post a Comment