विनायक जाधव,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत म्हसळा शहरासाठी रु.१,७२,२३,२५३/- (रुपये एक कोटी बाहत्तर लाख तेवीस हजार दोनशे त्रेपन्न) रकमेची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. अशी माहिती नगराध्यक्षा श्रीमती कविता शितल बोरकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष श्री.नाझिम हसवारे यांनी दि.१४ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष नाझिम हसवारे, नगराध्यक्षा कविता शितल बोरकर, उपनगराध्यक्ष नासिर दळवी, बांधकाम सभापती संतोष काते, नगरसेवक करण गायकवाड, नगरसेविका सेजल खताते, नगरसेविका जयश्री कापरे, भाई बोरकर आदि नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
उन्हाळ्यात, पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणा-या म्हसळे शहरातील जनतेला या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे. पहिल्या प्रथम म्हसळे शहरासाठी कोटी रुपयाच्या मोठ्या रकमेची नळ पाणी पुरवठा योजना राबवणार असल्याने येथील जनतेची तहान भागणार यात तिळमात्र शंका नाही.

Post a Comment